Type Here to Get Search Results !

राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित साहेबराव अंभोरे

राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित 

 साहेबराव अंभोरे







मेहकर बुलेटिन एक्सप्रेस


 दि.३० जून २५. मेहकर 

मेहकर - तालुक्यातील पांगरखेड येथील जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळेतील पदवीधर शिक्षक साहेबराव अंभोरे यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला आहे. गुणवत्ता वाढीसाठी शिक्षण क्षेत्रात राबविलेल्या नवीन संकल्पना, तंत्रज्ञानाचा वापर, गायन कलेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील खेडेपाडे, वाडी वस्ती तांडे,दऱ्याखोऱ्यातील आदिवासी गावे यामध्ये करत असलेले समाज प्रबोधनाचे गुणवत्तापूर्ण कार्यासाठी, शिक्षण क्षेत्रातील योगदान व समाजात सकारात्मक परिवर्तन घडवणाऱ्या कार्याबद्दल बी द चेंज फाउंडेशन निवड समिती कोपरगाव यांनी त्यांची सदर पुरस्कारासाठी निवड केली.

      दिनांक २९/०६/२०२५ रोजी शिर्डी येथे मा. पद्मश्री डॉ. पोपटराव पवार कार्याध्यक्ष,आदर्श गाव योजना,महाराष्ट्र शासन यांचे हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात त्यांचा मुलगा राहुल साहेबराव अंभोरे यांनी पुरस्कार स्विकारला. आजच्याच दिवशी त्यांना कोल्हापूर येथे अजून एक पुरस्कार राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्कार २०२५ मिळाला आहे. सदर पुरस्कार स्विकारण्यासाठी ते सहकुटुंब कोल्हापूर येथे गेलेले असल्याने शिर्डी येथील पुरस्काराला ते उपस्थित राहू शकले नाही.

     बी द चेंज फाउंडेशन दरवर्षी राज्यातील होतकरू शिक्षकांना पुरस्कार प्रदान करते. राष्ट्र उभारणी व समाज विकासाचे कार्य करण्याला शिक्षकांना प्रेरणा मिळावी हा उद्देश. 

     या यशाबद्दल साहेबराव अंभोरे यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या पुरस्कारांमुळे मला कार्य करण्यास नवऊर्जा, प्रेरणा मिळाली आहे असे त्यांनी मत व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments