मेहकर:गजानन राऊत
डोणगाव ग्रामपंचायत अधिकारी डी.टी.तांबारे यांना निलंबित
मेहकर गटविकास अधिकारी खरात यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली
क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या देवेंद्र आखाडे यांच्या तक्रारीवरून प्रशासनाची कारवाई
मेहकर:गजानन राऊत
डोणगाव.दिनांक ०२ जुलै २०२५ग्रामपंचायत डोणगाव (ता. मेहकर) येथे कार्यरत असलेले ग्रामसेवक श्री. दीपक तांबारे यांना दिनांक ०२ जुलै २०२५ रोजी पंचायत समिती मेहकर गटविकास अधिकारी खरात यांच्या आदेशानुसार निलंबित करण्यात आले आहे.
ही कारवाई . देवेंद्र रावसाहेब आखाडे (रा. डोणगाव) यांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आली असून, अतिक्रमण न काढणे वरिष्ठाच्या आदेशाचे पालन न करणे अतिक्रमण धारकांना पाठीशी घालून प्रोत्साहन देणे अतिक्रमण बाबत अहवाल येऊन सुद्धा वारंवार आदेश देऊन कारणे दाखवा नोटीस देऊन सदर ग्रामपंचायत अधिकारी यांनी हलगर्जीपणा करत कुठलीही कारवाई केली नाही म्हणून संबंधित तक्रारीवर चौकशी करून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (वर्तणूक) १९६७ च्या नियम ३ चार भंग केला त्यामुळे शासन आदेशानुसार कारवाई केली आहे.
सदर ग्रामसेवकाने ग्रामपंचायतीच्या कामकाजात नियमबाह्य व अनियमित स्वरूपाची कागदपत्रे सादर केल्याचे निदर्शनास आले. प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरकुलांचे प्रस्ताव विविध मुदतीत सादर केले नाही व संबंधित ग्रामसेवकाकडून कार्यक्षमतेचा अभाव,दैनंदिन गैरहजर,राहने,या
संपूर्ण प्रकरणाची चौकशी केल्यानंतर गटविकास अधिकारी (उ.प्र) पंचायत समिती मेहकर यांनी आदेश क्रमांक १२१६/२०२५, दिनांक ०८/०६/२०२५ नुसार, दिनांक ०२/०७/२०२५ रोजी निलंबनाची कार्यवाही अंमलात आणली.
--- श्री. दीपक तांबोरे यांच्याविरुद्ध पुढील विभागीय चौकशी प्रस्तावित असून, अंतिम निर्णय संबंधित चौकशी अहवालावर आधारित घेतला जाईल. संबंधित प्रकरणाची संपूर्ण माहिती जिल्हा परिषद बुलढाणा, मुख्य कार्यकारी अधिकारी व ग्रामविकास विभाग यांना सादर करण्यात आली आहे.
निलंबन काळामध्ये ग्रामविकास अधिकारी श्री तांबारे यांना तात्पुरते मुख्यालय पंचायत समिती मेहकर देण्यात आले असून निलंबन काळामध्ये कुठलेही खाजगी व्यवसाय व धंदा करता येणार नाही असे बजावण्यात आले.
तक्रारदारांचे मत:
श्री. देवेंद्र रावसाहेब आखाडे यांनी ग्रामपंचायतीमधील भ्रष्टाचार,अतिक्रमण न काढणे वरिष्ठांच्या आदेशाचे पालन न करणे निष्काळजीपणा आणि गरीब लाभार्थ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात तक्रार केली होती. प्रशासनाने त्वरित आणि पारदर्शक पद्धतीने कारवाई केल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
निष्कर्ष:
ग्रामसेवकांवरील ही निलंबन कारवाई ही ग्रामस्थांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या सामान्य नागरिकांच्या आवाजाला दिलेले महत्त्व आहे. या निर्णयामुळे ग्रामीण प्रशासनात पारदर्शकता आणि जबाबदारी वाढेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. लवकरच त्यांची खाते चौकशी सुरू होणार असून त्याच्यात पाठपुरावा करणार असल्याचं देवेंद्र रावसाहेब आखाडे यांनी सांगितलं. व मूळ तक्रारीवरील कारवाईसाठी येणाऱ्या काळामध्ये आपण आग्रही असणार आहे.

Post a Comment
0 Comments