Type Here to Get Search Results !

जानेफळ येथील नवसाला पावणारी हाकेला धावणारी जगदंबा मातादे वीच्या मंदिरात भाविकांनी केली ७७१ दिव्यांची आरास

 मेहकर बुलेटिन एक्सप्रेस

मेहकर तालुक्यातील जानेफळ येथील जगदंबा देवीचा नवरात्री उत्सवाला दि. २२ सप्टेंबर पासुन सुरूवात झाली असुन जानेफळसह परीसरातील भाविकांचे श्रद्धास्थान असून नवरात्री उत्सवात भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी होत असते ,




नवरात्रीमध्ये अखंड दीप लावल्याने अनेक संकटे अशी भाविकांची श्रद्धा असल्याने

   "दीप जळो, संकट टळो"



हा उपक्रम देवीच्या माळावर भाविक भक्ताच्या सहकार्याने दरवर्षी राबविल्या जात असतो

यावर्षी अखंड ७७१ दीप प्रज्वलित करून देवीला दिव्याची आरास केली आहे, नवरात्री काळात येथील मंदिरात दुर्गा सप्तशतीचे पाठ, व रात्री भजन दात्यांकडून भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात येत असते, जानेफळ येथील किशोर भाऊ कुलकर्णी देवीच्या मंदिराला २  सभामंडप अर्पण केली असून भाविक भक्ताच्या सहकार्याने मंदिर परिसरामध्ये अनेक विकास कामे पाहायला मिळत आहे, हे मंदिर जानेफळ बस स्टॅन्ड वरून पश्चिमेकडे अमलापुर रोडवर एका मोठ्या टेकडीवर जानेफळ चे ग्रामदैवत माळावरची देवी म्हणून प्रसिद्ध आहे, हा परिसर निसर्गरम्य वातावरण आणि सजलेला असून परिसरात अनेक मनमोहक झाडे आहेत नवरात्री उत्सवातील आकर्षक विद्युत रोषणाई ने भाविक मंत्रमुग्ध होत आहे तर माळावर महिलांसाठी गरबा स्पर्धेची ही आयोजन करण्यात येत असते त्यामध्ये अनेक महिला सहभागी होऊन नवरात्रीमध्ये गरबा नृत्याचा आनंद घेतात या मंदिराचा जिर्णोद्धार परिसरातील भाविक भक्तांच्या साह्याने घाटे परिवाराने केला असून अनेक वर्षापासून घाटे परिवारांकडे मंदिराचे व्यवस्थापन आहे.

नवरात्री उत्सव काळात जानेफळ येथील ठाणेदार अजिनाथ मोरे आपल्या पोलीस कर्मचाऱ्यासह अनुचित प्रकार घडू नये यासाठी व भाविक भक्तांना दर्शनासाठी कुठेही त्रास होऊ नये मंदिर परिसरात व मार्गावर ठाण मांडून चोख बंदोबस्त करीत असून सर्व नवरात्री उत्सव कार्यक्रमावर नजर ठेवून आहेत


Post a Comment

0 Comments