शेतकरी, कष्टकरी, शोषित-पिडीतांच्या हक्कासाठी लढा तीव्र करण्याचा निर्धार
बुलढाणा:गजानन राऊत
दि. २७ ऑगस्ट २०२५
बुलढाणा जिल्ह्यातील लोणार येथे ऑल इंडिया पँथर सेनेची महत्वपूर्ण बैठक आज संपन्न झाली. या बैठकीचे नेतृत्व ऑल इंडिया पँथर सेनेचे विदर्भ कार्याध्यक्ष भाई अमित काकडे यांनी केले.
या बैठकीदरम्यान भाई अमित काकडे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की,
“घराघरात पँथर निर्माण करा, संघटन वाढवा आणि शोषित-पिडीतांच्या हक्कांसाठी झटून लढा द्या. संविधान वाचवण्याची जबाबदारी आपलीच आहे.”
लोणार तालुक्यातील संघटन बांधणी आणि संघटनेच्या आगामी धोरणांवर सविस्तर चर्चा यावेळी झाली. या बैठकीस जिल्हा महासचिव सचिन मुळे, तालुका पदाधिकारी मुजाहिद सय्यद, अप्पू भाई सय्यद, सोनु भाई उबाळे,गजानन प्रधान, शोभाताई प्रधान, स्वप्निल उन्हाळे, तेजराव उन्हाळे, विशाल मोरे, रंजना प्रधान, आशा प्रधान यांच्यासह असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीदरम्यान शेतकरी, कष्टकरी, शोषित आणि पिडीत घटकांच्या प्रश्नांवर ठोस भूमिका घेण्याचा निर्धार सर्व कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. तसेच वढव-वेणी सर्कलमधून भाई अमित काकडे यांनी येणारी जिल्हा परिषद निवडणूक लढवावी, अशी मागणी सर्व उपस्थित भिमसैनिक आणि समाजबांधवांनी एकमुखाने केली.
अनेक कार्यकर्त्यांनी भाई अमित काकडे यांच्या नेतृत्वाला पाठिंबा दर्शविताना सांगितले की,
“भाईंच्या प्रत्येक निर्णयाला आम्ही खांद्याला खांदा लावून साथ देऊ, आणि त्यांना जिल्हा परिषदेत पाठवायचेच हा आमचा निर्धार आहे.”
बैठकीच्या शेवटी जिल्हा महासचिव सचिन मुळे आणि अप्पू भाई सय्यद यांनी संघटनाच्या कार्यपद्धतीबाबत मार्गदर्शन करून आगामी निवडणूक लढवण्यासाठी आवश्यक दिशा दिली.

Post a Comment
0 Comments