चिखली–मेहकर रोडवरील नागझरी फाट्यावर दुचाकी अपघात; युवक गंभीर जखमी
मेहकर : गजानन राऊत
मेहकर, दि. २७ डिसेंबर — चिखली–मेहकर रोडवरील नागझरी फाट्याजवळ झालेल्या अपघातात दुचाकीस्वार युवक गंभीर जखमी झाला आहे. राहुल यशवंत कुऱ्हाडे (वय २६, रा. खंडाळा देवी)ता.मेहकर जिल्हा बुलढाणा असे जखमी युवकाचे नाव आहे.
राहुल कुऱ्हाडे हा बुलढाणा जिल्ह्यातील मातला येथे मावशीच्या भेटीसाठी गेला होता. भेटीनंतर तो दुचाकी क्रमांक एमएच २८ एवाय १०८० वरून मेहकरच्या दिशेने घरी परतत असताना, दि. २७ डिसेंबर रोजी सायंकाळी सुमारे ६.३० वाजता नागझरी फाट्याजवळ अज्ञात वाहनाने धडक दिल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
अपघातानंतर नागझरी येथील नागरिकांनी तत्काळ सरकारी रुग्णवाहिकेला फोन करून जखमी युवकाला मेहकर कडे रवाना केले नागझरी फाट्यावर खंडाळा येथील नातेवाईक जाये पर्यंत हा युवक बेशुद्ध अवस्थेत होता व त्याला नातेवाईकांनी रुग्णवाहिकेत मेहकर अजिंठा हॉस्पिटल (डॉ. गट्टणी) येथे उपचारासाठी दाखल केले. सिटी स्कॅन तपासणीत त्याच्या हाताला गंभीर मार लागल्याचे निष्पन्न झाले असून, सध्या त्याची प्रकृती चिंताजनक नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले.



Post a Comment
0 Comments