गर्भवती नवविवाहितेची आत्महत्या,पती सह तिघा विरुद्ध गुन्हा दाखल.
जोपर्यंत आरोपी अटक होणार नाही तोपर्यंत मुहूर्त देहाला हात लावणार नाही वाढत्या तणावाला पाहता पोलिसांनी तत्परता दाखवत तिन्ही आरोपीला केली अटक.
मेहकर बुलेटिन एक्सप्रेस न्युज
मेहकर तालुक्यातील जानेफळ पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या आदिवासी बहुल ग्राम माळेगाव येथील 21 वर्षीय नवविवाहितीने सासरच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना 23 डिसेंबरच्या सकाळी साडेसात वाजता दरम्यान उघडकीस आली याप्रकरणी विवाहितेच्या माहेरील मंडळीने आरोपी अटक करा तेव्हाच मृतदेहाला हात लावू असा पवित्र घेतल्याने तिन्ही आरोपी अटक झाल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी
नेण्यात आला.
जानेफळ पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या ग्राम माळेगाव येथील साधना विष्णू चोडकर वय 21 वर्षे या महिलेचा विवाह हा 2024 मध्ये झाला होता अशात 23 डिसेंबर च्या सकाळी महिलेने गावातील सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या विहिरीत आत्महत्या केल्याची माहिती जानेफळ पोलीस स्टेशनला पोलीस पाटील यांनी दिली तेव्हा पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली तेव्हा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसून आला अशात घटनेची माहिती मिळतात महिलेचे माहेरील वाकद वाडी तालुका मालेगाव जिल्हा वाशिम येथील नातेवाईकांनी माळेगाव गाठून आमच्या मुलीला सासरच्या खूप त्रास होता या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केली असे सांगत जोपर्यंत सासू-सासरे व पती तिन्ही आरोपी अटक केल्या जात नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका घेतल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले पोलिसांनी तत्परता दाखवत सासू-सासरे यांना अटक केली तर पती विष्णू रामाभाऊ चोडकर याला मोबाईल लोकेशन च्या आधारावर नगर येथून अटक करण्यात आली त्यानंतर चार वाजता दरम्यान मुलीच्या माहेरील मंडळींनी मृतदेह ताब्यात घेतला यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे यांनी सुद्धा माळेगाव येथे भेट देऊन मुलींच्या नातेवाईकांची समजूत घातली मात्र जोपर्यंत आरोपी अटक झाल्याची खात्री नातेवाईकांना झाले नाही तोपर्यंत त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला नाही अखेर शेवटी चार वाजता दरम्यान पोलिसांनी व्हिडिओ कॉल द्वारे आरोपी अटक झाल्याची माहिती नातेवाईकांना दिल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला व त्याचे सौ इच्छेदन साठी मेहकर येथे पाठवण्यात आले.
कौटुंबिक अत्याचार सहन न झाल्याने सरते शेवटी सौ साधना या 21 वर्षीय विवाहितेने आपल्या पोटातील पाच महिन्याच्या बाळासह आत्महत्या सारखा विघातक पाऊल उचलला माहेरची मंडळी सांगत होती या विवाहितेला सासरच्या मंडळीकडून शारीरिक व मानसिक त्रास होता तसेच माहेरून पैसा आणण्यासाठी नेहमी तगादा लावत होते या जातालात कंटाळून तीने आत्महत्या केली या फिर्यादीवरून जानेफळ पोलीस स्टेशन ने सासू सौ शोभा रामभाऊ चोडकर सासरा रामभाऊ चोडकर, पती विष्णू रामभाऊ चोडकर या तिघावृत्त गुन्हा दाखल केला असून तिन्ही आरोपी अटक करण्यात आले यावेळी ठाणेदार अजिनाथ मोरे, उप पोलीस निरीक्षक संतोष जाधव, पोलीस हेड कॉन्स्टेबल मोहन सावंत, विशाल धोंडगे विष्णू यांनी तत्परता दाखवत आरोपी पतीला नगर इथून अटक केले.

Post a Comment
0 Comments