Type Here to Get Search Results !

अधिवेशन सुरू असतांना मुंबई येथील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष यांना डोणगांल पोलिसांनी डॉ.टाले यांना केले स्थानबद्ध

डोणगाव- मेहकर



मुंबई येथील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सोयाबीन कापूस संपूर्ण कर्जमुक्ती ध्यान कांदा दूध उत्पादक यांना अनुदान अशा विविध मागण्यांना घेऊन मुंबई येथील अरबी समुद्रामध्ये कर्जमुक्ती साठी सातबारे बुडवणार व सोयाबीन कापूस भाव परकासाठी कापूस व सोयाबीन मुंबई येथे अरबी समुद्रात फेकण्याच्या राज्य सरकारला इशारा दिला होता. त्या अनुषंगाने जिल्ह्यामध्ये प्रमुख कार्यकर्त्यांसह क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर टाले यांच्यासह मेहकर तालुक्यातील बऱ्याच कार्यकर्त्यांना  निवासस्थानावरुन रात्री ४:३०  वा.धरपकड सुरू केली..! सर्वांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आले आहे डोणगाव पोलीस स्टेशन मध्ये अटक आहे..


राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या आंदोलनाची धास्ती घेतली असून जवळपास मुंबईला जाणारे व इतरही लोकांना ताब्यात घेतली असून सरकार आंदोलन कर्त्यांना घाबरले असून शेतकऱ्यांच्या आंदोलनाची ही ताकद असते हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. शेतकरी नेते रविकांत तुपकर साहेबांनी सरकार हलवलं आहे. एवढं मात्र खरं. 

 सरकार सत्तेचा व पोलिसांचा वापर करून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत आहे मात्र आंदोलन झाल्याशिवाय राहणार नाही हे सरकारने लक्षात ठेवावं. शेतकऱ्यांच्या सोयाबीनला भाव नाही उत्पादन खर्च सुधार भरून निघत नाही बऱ्याच शेतकऱ्यांना एकही कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. तसेच सोयाबीन आणि कापसाचा भाव फरक व संपूर्ण कर्जमुक्ती मिळावी यासाठी येऊ दोन वर्षासाठी बसून विविध आंदोलने रविकांत तुपकर साहेबांच्या नेतृत्वामध्ये झाले आहेत आणि काही मागण्या अजून पर्यंत सरकारनं उर्वरित पीक विमा दिला नसल्यामुळे व भाव फरक व कांदा अनुदान व दूध अनुदान अशा मागण्यासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करणं हा शेतकऱ्यांचा अधिकार आहे शेतकऱ्यांसाठी भाव मागायचा नाही का मात्र सत्ताधाऱ्यांच्या दबावापोटी पोलिसांनी आंदोलनकर त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीसुद्धा शेतकऱ्यांसाठी लढत राहू कितीही वेळा अटक केलं तरी आंदोलन थांबणार नाही असे यावेळी डॉ.ज्ञानेश्वर टाले. यांनी सांगितले यावेळी पोलीस स्टेशनमध्ये देवेंद्र आखाडे अरविंद दांदडे ऋषांक चव्हाण रामेश्वर वायाळ भागवत काळे मंगेश देशमुख श्रीकांत काळे जावेद खान गणेश धाबे संदीप नालींदे रुपेश खोरणे. नितीन कुमार बोरकर.

Post a Comment

0 Comments