Type Here to Get Search Results !

रिपब्लिकन सेनेच्या वतीने मेहकर तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले - महाबोधी महाविहार बुद्धगया येथे बौद्ध भिक्षू यांचे चालू असलेला उपोषण यांना पाठिंबा निवेदन मार्फत देण्यात आला




मेहकर दि 13/03/2025

महाबोधी महाविहार बुद्धगया येथे बौद्ध भिक्षू यांचे चालू असलेले अमरण उपोषण   

त्यांना समर्थन रिपब्लिकन सेना मेहकर तालुका यांच्यावतीने माननीय तहसीलदार साहेब मेहकर यांच्यामार्फत महामयी राष्ट्रपती यांना निवेदन देण्यात आले  निवेदनात असे म्हटले आहे की 1949 चा टेम्पल ॲक्ट अधिनियमात सुधारणा करून संपूर्ण व्यवस्थापन बौद्ध भिक्षू समाजाच्या हातात सोपविण्यात यावे महाबोधी महाविहार हे भगवान बुद्ध यांना ज्ञान प्राप्त झालेली ठिकाण आहे महाबोधी महाविहार हे बऱ्याच वर्षापासून ब्राह्मण समाजाच्या ताब्यात आहे ज्याचा बौद्ध धर्माशी कुठलाही संबंध नाही ज्या बुद्ध विहारातून संपूर्ण जगात शांतीचा संदेश पसरवला पाहिजे त्यासाठी बुद्ध विहाराची निर्मिती सम्राट अशोक राज यांनी केली होती परंतु त्या बुद्धविहारावर ब्राह्मणवादी जातीवाद्यांनी अतिक्रमण केलेली आहे  श्री काशी विश्वनाथ मंदिर कायदा 1983 ॲक्ट ज्या कायद्यात तरतूद आहे जी व्यक्ती हिंदू नसणार त्या व्यक्तीला मंदिराच्या कुठल्याही समितीचा सदस्य होता येणार नाही तेथे कर्मचारी सुद्धा हिंदूच पाहिजेत कलम तीन सहा दोन तरतूद आहे मग महाबोधी महाविहार बुद्धगया येथे बौद्ध का नाही हे सर्व बदललं पाहिजे बौद्ध समाजाच्या भावना लक्षात घेऊन बुद्ध विहार परिपूर्ण बौद्ध भिक्षू यांच्या ताब्यात दिले पाहिजेत बुद्धगया येथे सुरू असलेल्या आंदोलनात बौद्ध भिक्षूच्या सर्व मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे  अशी मागणी रिपब्लिकन सेनेच्या वतीने मेहकर तालुक्यातील करण्यात आले यावेळी निवेदन देताना 

मेहकर तालुका अध्यक्ष रिपब्लिकन सेना पंकज वाघ 

मेहकर तालुका उपाध्यक्ष सुनील कांबळे 

मेहकर तालुका सचिव सुमेध अवसल मोर 

मेहकर तालुका महासचिव सुमित मोरे 

मेहकर तालुका संघटक रामचंद्र जाधव 

मेहकर तालुका सहसंघटक आकाश इंगोले 

मेहकर तालुका प्रभारी रंजीत सदावर्ते

हे सर्व उपस्थित होते


Post a Comment

0 Comments