Type Here to Get Search Results !

आमसभा व सरपंच मेळाव्यात स्वरसम्राट गायन संचाचे गीतगायन...

 आमसभा व सरपंच मेळाव्यात स्वरसम्राट गायन संचाचे गीतगायन...

मेहकर गजानन राऊत

पंचायत राज समितीच्या शिफारशीप्रमाणे पंचायत समिती, मेहकर येथे सन २०२४-२०२५ ची वार्षिक आमसभा व सरपंच मेळावा

दि. २९/०३/२०२५ रोज शनिवार सकाळी ११ वाजता मा.आ.श्री सिध्दार्थ खरात (आमदार मेहकर विधान सभा मतदार संघ) यांच्या अध्यक्षतेखाली तथा 




मा.ना.श्री प्रतापराव जाधव (खासदार तथा केंद्रीय मंत्री आयुष तथा कुटूंब कल्याण) (स्वतंत्र प्रभार) यांच्या प्रमुख उपस्थितीत शेतकरी भवन मेहकर येथे आयोजित करण्यात आला होता.

     याप्रसंगी साहेबराव अंभोरे प्रस्तुत स्वरसम्राट गायन संचाने बहारदार गीते सादर केली. गायक तथा शिक्षक साहेबराव अंभोरे यांनी दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर, रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे, लाल दिव्याच्या गाडीला ही महापुरुषांची स्फूर्तीदायी गीते सादर केली तर प्रियंका अंभोरे व प्रतिक्षा अंभोरे यांनी इतिहासाचे रंग रूप हे आले या नगरा हे स्वागतगीत सादर




 करून उपस्थितांची मने जिंकली.

    महाराष्ट्राचे प्रख्यात बँजो वादक संदिप बोदडे, ढोलक वादक अशोक जावळे यांनी आपल्या तालबद्ध वादनाने कार्यक्रमात रंगत आणली. शिक्षक संजू अंभोरे यांनी तबला तर साहेबराव अंभोरे यांनी हार्मोनियम वादन केले.

    याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते स्वरसम्राट गायन संचातील सर्व कलावंतांचा सत्कार करण्यात आला.

Post a Comment

0 Comments