Type Here to Get Search Results !

स्विफ्ट डिझायर मध्ये चालकाचे सीटवर आढळला मृतदेह ज्ञानेश्वर पांडुरंग मस्के असे पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव आहे

 स्विफ्ट डिझायर मध्ये चालकाचे सीटवर आढळला मृतदेह ज्ञानेश्वर पांडुरंग मस्के असे पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव आहे


मेहकर :गजानन राऊत





देऊळगाव राजा सिंदखेड राजा रोडवरील राजलक्ष्मी शाळेसमोरील फॉरेस्टाच्या जमिनीत एका कार मध्ये

संशयास्पतद अवस्थेत एक मृतदेह आढळल्याने येथील परिसरात एकच खळबळ उडाली हे खून की आत्महत्या हा मोठा प्रश्न पडला या घटनेची माहिती मिळताच देऊळगाव राजा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष महात्ले व त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली फिर्यादी विष्णू विठ्ठल म्हस्के वय 47 वर्ष . रा. गिरोली खु) यांच्या तक्रारीवरून अज्ञात , व्यक्तीविरुद्ध

कायमी अप क्रं. 

130/2025- अंतर्गत कलम 103/(1) BNS. नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनास्थळ व प्राथमिक तपास दि. 29 मार्च 2025 रोजी रात्री 7:30 पासून ते 30 मार्च 2025 च्या सकाळी 10 वाजेच्या दरम्यान ही घटना घडली मयताचे नाव ज्ञानेश्वर पांडुरंग मस्के वय 42 वर्ष राहणार गिरोली खु) असे असून तो स्वतःच्या , स्विफ्ट डिझायर कार -MH 20-DV 3063 मध्ये चालकाच्या सीटवर मृत अवस्थेत




आढळल्याने अज्ञात व्यक्तीने त्याचा गळा आवळून हत्या केल्याचं संशयसंशय पोलिसांना आहे

पोलीस तपास सदर घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक, संतोष महत्ले करीत असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देखील घटनास्थळी भेट देऊन पोलीस अधीक्षक अप्पर पोलीस अधीक्षक एस. डी. पी. ओ. 

मनीषा कदम यांनी देखील घटनास्थळी धाव घेत पाहणी करून पुढील

गुन्हाचा तपास, पोलीस. विविध अंगांनी तपास करीत असून, म मृतकांच्या संपर्कातील व्यक्ती व, सीसीटीव्ही फोटेज तसेच कॉल रेकॉर्ड तपासल्या जात आहे आरोपींचा लवकरच शोध लागेल असं आश्वासन पोलिसांनी व्यक्त केले आहे या घटनेमुळे गिरोली (खु) तसेच परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे व पोलीस नागरिकांना देखील सहकार्य करायचे आवाहन करीत आहे

Post a Comment

0 Comments