जि. वि. प्र. गजानन राऊत
बुलढाण्यात तीन वाहनाचा विचित्र अपघात झाला आहे या अपघातामध्ये पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर 25 जण गंभीररित्या जखमी आहे त्यापैकी सहा जणांची प्रकृती चिंताजनक आहे
बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव शेगाव मार्गावर पहाटे तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला आहे एसटी बस कार आणि ट्रॅव्हल्सच्या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे या अपघातामध्ये 25 जण जखमी झाले आहेत या जखमींवर खामगाव जळगाव अकोला येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत अपघातामधील जखमी पैकी सहा जणांची प्रकृती चिंताजनक आहे अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी मदत कार्य सुरू केले आहे
मिळालेल्या माहितीनुसार आज पहाटे साडेपाच वाजता शेगाव खामगाव महामार्गावर तीन वाहनाचा विचित्र अपघात झाला यामध्ये पाच जणांचा जागीच मृत्यू झालाय तर खाजगी प्रवासी एसटी व बोलेरो या तीन वाहनाचा भीषण अपघात झाला या अपघातातील परवासी झोपेत असताना भरधाव बोलेरो कार एसटी बसवर धडकली त्यानंतर पाठीमागून येणारी खाजगी प्रवासी बस ही या अपघात ग्रस्त वाहनांना धडकली त्यामुळे बोलोरो चा चंदा मंदा झाला या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला तर 25 जण जखमी आहेत जखमींवर खामगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत
यातील प्रवासी साखर झोपेत असताना खामगाव शेगाव महामार्गावर, जयपुर लांडे फाटा समोरील तीन वाहनाचा विचित्र अपघात झाला तीन वाहनाचा विचित्र अपघातामुळे परिसर हादरून गेला आहे प्रवाशांच्या किंकाळ्या अन जीव वाचवण्यासाठी धडपड होती स्थानिकांनी तात्काळ पोलिसांना याबाबतची माहिती दिली व पोलिसांनी तात्काळ मदत कार्य सुरू केले जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले
तीन वाहनांचा विचित्र अपघातामध्ये पाच जणांचा जागीच मृत्यू झाला व त्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे अपघातामधील 25 जखमींना उपचारासाठी खामगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे जखमी मधील सहा जणांची प्रकृती अतिशय गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे जखमी पैकी काहीची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना उच्चस्तरीय उपचारांसाठी बुलढाणा आणि इतर मोठ्या रुग्णालयात घालवण्यात येत आहे अपघातात काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली पहाटे हा अपघात झाल्यामुळे जोरदार आवाज झाला त्यामुळे स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली आपत्कालीन सेवांना सूचना देण्यात आल्या. व पोलिसांनी तात्काळ वेळेवरच मदत करणे सुरू केले आहे पुढील तपास पोलीस करीत आहे



Post a Comment
0 Comments