Type Here to Get Search Results !

गोहोगाव दांदडे येथील ग्रामस्थानाचेअमरण उपोषण पंचायत समिती समोर क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह गावकऱ्यांचे आमरण उपोषण भ्रष्टाचार करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल मागणी उपोषण कर्त्यानी केलीकरण्याची




प्रतिनिधी.मेहकर


 मेहकर.दि.०३/०४/२०२५

मेहकर तालुक्यातील पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या गोहगाव दांदडे येथील ग्रामपंचायत मध्ये १५व्या वित्त आयोगातील कामांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप तसेच दलित वस्तीतील काम ठरावाप्रमाणे नसून इतरत्र ठिकाणी करण्यात आल्याचा आरोप व रोहयो घ्या कामामध्ये सुद्धा रोजगार सेवकांनी आपल्या घरचेच वारंवार मजूर दाखवून पैसे काढून खूप मोठ्या प्रमाणात शासनाची दिशा भुल केली व भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप या उपोषणकर्ते यांनी केला




हे उपोषण दि. ०२/०४/२०२५ पासून सुरू करण्यात आले आहे जो पर्यंत मागणी पूर्ण होत नाही तो पर्यंत गावकर्यांनी  आमरण उपोषण माघार घेणार नसल्याची  पवित्रा घेतली आहे .ग्रामपंचायत सचिव व सरपंच यांनी १५ वित्त आयोगाच्या निधीमधून वेळोवेळी केलेल्या खरेदी या शासनाच्या नियमाप्रमाणे केलली नसून अतिशय निकृष्ट दर्जाच्या वस्तू खरेदी केल्याचा आरोप आहे त्या वस्तू चे बिल व रेकॉर्ड सुद्धा ग्रामपंचायत मध्ये उपलब्ध नसून सदर खरेदी ही जी.एम. पोर्टल द्वारे करणे आवश्यक असताना देखील करण्यात आली नाही याप्रकरणी वारंवार गटविकास अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रारी करून सुद्धा कारवाई होत नव्हती. सरपंच पती ग्रामपंचायत कारभारामध्ये हस्तक्षेप करत असल्यामुळे कामे प्रभावित होत असून सचिव गावामध्ये राजकारण करत असल्यामुळे पात्र लाभार्थ्यांचे मोदी आवास योजनेचे घरकुल प्रस्ताव हे पंचायत समितीला पाठवलेच नाही व काही अधिकाऱ्यांसोबत संगणमत करून व लाभार्थ्याकडून पैसे घेऊन अपात्र लाभार्थ्यांना घरकुल देण्यात आले याची संपूर्ण चौकशी करून फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात यावी. तसेच सदर ग्रामपंचायतचा कारभार इतर ठिकाणचा ग्रामपंचायत अधिकारी त्या ठिकाणचा तत्कालीन (सचिव)येऊन करत असल्याचा आरोप उपोषणकर्ते यांनी केला होता.याबाबत वारंवार लेखी निवेदन तक्रारी देऊन सुद्धा चौकशी होत नसल्यामुळे आज क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी अरविंद दांदडे, जुबेर मोहम्मद खाजा देशमुख व दत्तात्रय नथूजी दांदडे महादेव लखुजी जमवे महमूद शेख इस्माईल उपोषण करत आहेत. उपोषणाचा त्यांचा दुसरा दिवस असून वैद्यकीय अधिकाऱ्याने उपोषणकर्त्यांची तपासणी केली असून उपोषण करत्यां ची तब्येत खालावत चालली असून पंचायत समिती प्रशासन हलगर्जीपणा करत असल्याचं लक्षात आल्यानंतर क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी सहाय्यक गटविकास अधिकारी व विस्तार अधिकारी पंचायत यांची भेट घेऊन तात्काळ उपोषणकर्त्यांच्या मागणीची दखल घ्यावी अन्यथा रस्त्यावर उतरून आक्रमक पणे आंदोलन करू असा इशारा गणेश गारोळे, कैलास उतपुरे प्रवीण उतपुरे, प्रफुल देशमुख, देवेंद्र आखाडे जुबेर खान, संदीप नालींदे, सागर मुरकुटे, यांनी दिला.

Post a Comment

0 Comments