बुलढाणा: गजानन राऊत
प्रतापराव जाधव यांच्या पर्यटक परतीच्या कार्याची दखल
शिवसेना पक्ष मुख्य नेते
ना .उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आभार दौरा निमित्त बुलढाणा येथे २७ एप्रिल२०२५ रोजी , आले होते टिळक क्रीडा नाट्य मंदिराच्या प्रागणात झालेल्या सभेला उद्देशुन
बोलताना ना एकनाथ .शिंदे त्यांनी ना. प्रतापराव जाधव यांनी केलेल्या, कार्याचा गौरव केला आहे जम्मू आणि काश्मीर मधील पहलगाम येथे आतंकवाद्यांनी केलेल्या आल्यानंतर बुलढाणा जिल्ह्यातील व इतर राज्यातील पर्यटकांना सुखरूप त्यांच्या घरी पोहोचलेल्या ना. प्रतापराव जाधव यांच्या कार्याची शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या भाषणात दखल घेऊन त्यांच्या कार्याची सुस्ती केली जम्मू काश्मीर मध्ये झालेल्या आतंकी हाल्लात २६ जण, निष्पाप नागरिक मारल्या गेले त्यात ६ जण महाराष्ट्रातील होते या हल्ल्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील ५१ पर्यटक जम्मू आणि काश्मीर मध्ये अडकले होते त्या पर्यटकांना सुखरूप आणण्यासाठी केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव हे, स्वतः जम्मू आणि काश्मीरमध्ये जाऊन , त्या अडकलेल्या पर्यटकांना भेटले त्यांची अवस्था करून त्यांना बुलढाणा येथे आणण्यासाठी
जम्मू काश्मीर ते दिल्ली आणि तिथून भुसावळ पर्यंत रेल्वेने सुखरूप आणले या कार्याचे ना. शिंदे यांनी कौतुक केले, यावेळी व्यासपीठावर ना. गुलाबराव पाटील. ना. संजय राठोड. अनुसूचित जाती विकास आयोगाचे अध्यक्ष आनंदराव अडसुळ आमदार संजय गायकवाड
माजी आमदार संजय रायमुलकर. डॉ. शशिकांत खेडेकर शिवसेना जिल्हाप्रमुख. शांताराम दाणे. बळीराम मापारी. ओमसिंग राजपूत .महिला आघाडी जिल्हाप्रमुख मायाताई मस्के, शारदा खानझोड, युवा सेना सहसचिव महाराष्ट्र राज्य तथा युवा सेना जिल्हाप्रमुख ऋषी जाधव, युवा सेना कार्यकारिणी सदस्य कुणाल गायकवाड ,उपजिल्हाप्रमुख संजय आवताडे भोजराज पाटील ,शिवाजी देशमुख, दीपक बोरकर, राजू मिरगे , देविदास घोपे , राहुल मारोडे , संतोष डिवरे, बाबुराव मोरे , तालुकाप्रमुख. धनंजय बारोटे, सुरेश वाळोकर, रामदास चौथनकर, राजेंद्र बघे, रामेश्वर धारकर, अजय पारसकर, केशव ढोकणे, विजय साठे, सुनील जुनारे, वैभव देशमुख ,अनिल चित्ते, गजानन मोरे ,गजानन दांदडे, विलास घोलप ,संतोष लिप्ते, संजय भुजबळ, रमेश भट्टड, रवींद्र दांडगे ,किशोर नवले, अनिल जांगडे, जयचंद्र भाटिया, पांडुरंग सरकटे ,बालाजी मेहेत्रे, गोपाल व्यास ,तथा, बहुसंख्य शिवसैनिक उपस्थित होते
बुलढाण्यात उपमुख्यमंत्री मा. ना. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या जनआभार यात्रेची ऐतिहासिक सभा संपन्न नुकताच काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मरण पावलेल्या नागरिकांसाठी बुलढाण्यातील जिजामाता प्रेक्षागार समोर आयोजित सभेच्या सुरुवातीला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. हल्ल्यातील बळींना आदरांजली वाहताना उपस्थित सर्वांनी दोन मिनिटांचे मौन पाळले आणि त्यांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या.
यानंतर, शिवसेनेच्या जनआभार यात्रेअंतर्गत उपमुख्यमंत्री मा. ना. एकनाथजी शिंदे साहेबांनी भव्य जाहीर सभेत बुलढाणावासीयांशी थेट संवाद साधला. हजारोंच्या गर्दीने गडगडलेल्या या सभेत, साहेबांनी बुलढाणा जिल्ह्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय आणि ग्वाही दिल्या.
सभेत बोलताना त्यांनी बुऱ्हाणपूर, मलकापूर, मोताळा, बुलढाणा आणि चिखली या रेल्वे प्रकल्पांसाठी केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा करून प्रकल्प पूर्णत्वास नेण्याचे आश्वासन दिले. तसेच, "जिथे संकट, आपदा, आपत्ती तिथे मा. ना. एकनाथजी शिंदे साहेब" हे जनतेचे समीकरण जपताना सेवा आणि तत्परतेचा पुनरुच्चार केला. देशाच्या सुरक्षेसंदर्भातील बैठकीत अनुपस्थित राहणाऱ्या गटावर त्यांनी ठामपणे टीका केली आणि बुलढाणा जिल्ह्याला विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, असे ठाम आश्वासन दिले.लाडकी बहीण योजना कधीही बंद पडू देणार नाही," तसेच "महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत साडेपाच लाख रुपयांचे आरोग्यविमा संरक्षण मंजूर करण्यात आले आहे," अशा ठोस घोषणांनी जनतेच्या मनात विश्वास निर्माण केला.
"जनतेची सेवा करणे आणि बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण करणे हेच माझे जीवनाचे ध्येय आहे," असे त्यांनी अत्यंत भावनिक शब्दांत व्यक्त केले.
या ऐतिहासिक सभेत आमदार धर्मवीर संजुभाऊ गायकवाड यांनी आपल्या अफाट जनाधाराचे दर्शन घडवले. संजूभाऊंच्या प्रेमासाठी हजारोंचा समुदाय स्वतःहून या सभेला उपस्थित राहिला होता. जनतेच्या हृदयात संजूभाऊंवर असलेले निस्सीम प्रेम आणि विश्वास पुन्हा एकदा अधोरेखित झाले.
उपमुख्यमंत्री मा. ना. एकनाथजी शिंदे साहेबांनीही संजय गायकवाड यांच्या कार्याचा उल्लेख करत बुलढाण्यात सिंचन, कृषी, शहर सौंदर्यीकरण आणि महामानवांचे पुतळे उभारण्यासारखी ऐतिहासिक कामगिरी केल्याचे गौरवोद्गार काढले. "संजय गायकवाड यांनी अशी कामगिरी करून दाखवली आहे, जी न भूतो न भविष्यति ठरेल," अशा शब्दांत त्यांनी संजूभाऊंच्या कार्याची प्रशंसा केली.
आजची सभा बुलढाण्याच्या विकासाला नवी दिशा देणारी ठरली असून, जनतेमध्ये नवचैतन्याचे आणि विकासाचे नवे स्वप्न रुजवणारी ठरली आहे.




Post a Comment
0 Comments