Type Here to Get Search Results !

उबाठा शिवसेनेचा ट्रॅक्टर मोर्चा बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर आ.सिद्धार्थ खरात हजारो शेतकऱ्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले

 

बुलढाणा:गजानन राऊत



शेकडो ट्रॅक्टरासह हजारो शेतकरी उतरले रस्त्यावर कर्जमाफीसाठी उभाटा ने महायुती सरकारला विचारला जाब निवडणुकीत दिलेली सर्व आश्वासने विसरलेल्या महायुती सरकारला जाब विचारण्यासाठी शुक्रवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आक्रमक भूमिका घेत ट्रॅक्टर मोर्चा काढला हजारो शेतकरी यामध्ये सहभागी झाले या ट्रॅक्टर मोर्चा ने बुलढाणा जिल्ह्यातील वाहतूक कोंडी झाली अर्थात शासन प्रशासनाची ही कोंडी यामुळे झाली हजारो शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून या मोर्चामध्ये सहभाग नोंदवला शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी राज्यभरात पेटल आणि शेतकऱ्यांची कर्जमुक्ती होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा इशारा या ट्रॅक्टर मोर्चाच्या माध्यमातून देण्यात आला,

उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार सिद्धार्थ खरात आक्रमक शिवसेना प्रवक्ता जयश्री शेळके जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांच्यासह, प्रमुख पदअधिकाऱ्यांच्या



नेतृत्वात जिजामाता प्रेक्षगार परिसरातून या मोर्चाला सुरुवात झाली संगम चौक जयस्तंभ चौक मार्गे मोर्चा जिल्हा अधिकारी कार्यालयावर धडकला यावेळी शिष्टमंडळाने जिल्हा अधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन दिले, तत्पूर्वी जिजामाता प्रेक्षसागरावर झालेल्या सभेत दत्ता पाटील संदीप शेळके डीएस लहाने यांच्यासह नेत्याच्या आक्रमक भाषणानी या मोर्चाला जोश भरला या मोर्चात सह संपर्कप्रमुख दत्ता पाटील महिला आघाडी जिल्हा संघटिका विजय हडसन जिल्हा संघटक प्रा डी एस लहाने गोपाल बछिरे जिल्हा, समन्वयक संदीप शेळके युवा सेना जिल्हाप्रमुख नंदू कुऱ्हाडे शुभम पाटील संजीवनी वाघ प्रा .अशिष रहाटे सुनील घाटे  बद्री बोडके तुकाराम काळपांडे लखन गाडेकर विजय इंगळे लिंबाजी पांडव, प्रा. किसन धोंडगे गजानन वाघ श्रीराम खेलदार दीपक चांभारे ईश्वर पांडव प्रा. सिद्धेश्वर आंधळे मोहित राजपूत मोहम्मद सोफियान गणेश सोनवणे अशोक गव्हाणे सुधाकर आघाव किशोर गारोळे गोविंद झोरे श्रीराम झोरे डॉ. अरुण पोकळे, संजय वडतकर गजानन उबराहंडे विजय इतवारे सुनील गवते संजय गवळी बबन खरे संजय शिंदे राजू मुळे तसेच शिवसेना युवासेना महिला आघाडी किसान सेना तसेच सर्व अगीकृत संघटनाचे पदाधिकारी कार्यकर्ते व शेतकरी या मोर्चात सहभागी झाले होते सूत्रसंचालन युवा सेना जिल्हाप्रमुख नंदू कुऱ्हाडे व तालुकाप्रमुख लखन गाडेकर यांनी केले महायुतीचे सरकार फसवे असा टोला आमदार सिद्धार्थ खरात यांनी यावेळी लगावला आमदार सिद्धार्थ खरात म्हणाले की आता शेतकरी जागा झाला आहे शिवसेना हा एकमेव पक्ष शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे महायुतीतील एक तरी आमदार नेत्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवला आहे का असा सवाल यावेळी केला खोटी आश्वासने देऊन महायुतीने सत्ता मिळवली आता ते सत्तेचे लोणी, खाण्यात व्यस्त असून महायुतीचे हे सरकार फसवे आहे असेही आमदार सिद्धार्थ खरात यावेळी म्हणाले नाफेडची खरेदी केंद्र बंद आहेत अजूनही सोयाबीन शेतकऱ्यांच्या घरात पडून आहे आता झोपेची सॉंग घेणाऱ्या सरकार विरोधात शिवसेनेचे भगवे वादळ पेटून कुठले आहे विश्वासघाती सरकारला आंदोलनाचा वनवा भस्म सात करेल जयश्रीताई शेळके शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू म्हणत, महायुतीचे सरकार सत्तेत आले मात्र तीन महिन्याच्या आत त्यांनी शेतकऱ्यांचा विश्वासघात केला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना दिलेला शब्द पाळला मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली मात्र आत्ताचे हे महायुतीचे सरकार अतिशय विश्वासघातकी आहे असा हल्लाबोल शिवसेने च्या राज्यप्रवक्ता जयश्री शेळके यांनी केला कर्ज बुडवा मोठ्या कंपन्या आणि उद्योगपतीचे कर्ज सरकारने राईट ऑफ केले म्हणजे एक प्रकारे माफच केले मात्र, उन्हातानात परिश्रम करणाऱ्या मायबाप शेतकऱ्यांना सरकारने वाऱ्यावर सोडले आहे शेतकऱ्यांच्या




 आत्महत्या वाढत आहे विदर्भ मराठवाड्यात गतकाळात अडीच हजारावर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्यामुळे या सरकारला लाज वाटली पाहिजेत शिवसेने शेतकऱ्यांच्या कर्जमुक्ती आंदोलनाच्या वनवा पेटला आहे या वनव्यात हे महायुती सरकार भस्मसात होईल, असा टोला जयश्रीताई शेळके यांनी लगावला आहे हक्काची कर्जमाफी मिळून घेणारच शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत म्हणाले की शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही बेरोजगारी वाढली आहे गावागावात प्यायला पाणी नाही सरकारने जुमला करून वेगवेगळी आश्वासन देऊन निवडणुका जिंकल्या मात्र या आश्वासनाची पूर्तता केली नाही, कर्जमाफीचे आश्वासन दिले आता सरकारने शब्द फिरवला आहे शालेय विद्यार्थ्यांना वर्षे झाले तरी गणवेश मिळाला नाही लोकांची दिशाभूल करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे मात्र सरकारने आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये सरकारला जाब विचारण्यासाठी हा मोर्चा आहे निर्दयी व खोटा द्या सरकारला भानावर आणण्यासाठी हा ट्रॅक्टर मोर्चा आहे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात कर्जमाफी मिळून घेतल्याशिवाय शिवसेना स्वस्थ बसणार नाही असा इशारा बुधवत यांनी दिला आहे

Post a Comment

0 Comments