Type Here to Get Search Results !

आगग्रस्त मेहकर नगरपालिकेची पुनर्वसन अधिकाऱ्याकडून पाहणी

 





मेहकर:गजानन राऊत

मेहकर नगरपालिकांच्या अभिलेख विभागाला आग लागल्याने मेहकर शहरात एकच खळबळ


 मेहकर दि:५ मे २०२५

पुनर्वसन अधिकाऱ्याकडून पाहणी नाराजी व्यक्त  करण्यात आली फायर सेफ्टी नसल्यामुळे केली नाराजी व्यक्त विविध उपायोजनांबाबत केल्या सूचना

मेहकर नगरपालिकेतील अभिलेख विभागात ३ मे रोजी आग लागली होती या आगे मध्ये महत्त्वाचे दस्तावेज जळून खाक झाले होते  जिल्हा पुनर्वसन अधिकारी सदाशिव शेलार यांनी मेहकर नगरपालिकेला भेट दिली व संपूर्ण अभिलेख रूमची पाहणी केली यावेळी नगरपालिकेत फायर सेफ्टी नसल्याने नाराजी व्यक्त केली भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी विविध उपयोजना करण्याबाबत सूचना यावेळी केल्या

यावेळी अतिक्रमधारक व्यवसायिकांनी उपरोक्त आगीत आमचे सर्व दुकानांचे रेकॉर्ड हि जळाले का अशी विचारणा सुद्धा यावेळी केली संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ मेहकर तालुक्यातील अभिलेख विभागाला आग लागणं म्हणजे आश्चर्यचकित बाब आहे स्थानिक नागरिकांकडून याबाबतची नाराजी ही व्यक्त होताना दिसून आली आहे  ३ मे रोजी अभिलेख विभागाच्या रेकॉर्ड रूमला आग लागल्याने सन १९३० पासूनचे ऑडिट झालेले रेकॉर्ड या

 आगीत जळाले आगीच्या संरक्षणासाठी अत्यावश्यक अग्निशामक दल फायर सेफ्टी प्रणालीच मेहकर नगरपालिकेत उपलब्ध नसल्याने , मोठ्या प्रमाणात महत्त्वाचे दस्तावेत जळून खाक झाले आहे जिल्हा पुनर्वसन अधिकारी सदाशिव शेलार यांनी संपूर्ण घटनेची  रेकॉर्ड रूमची पाहणी सुद्धा केली मेहकर नगरपालिकेत फायर सेफ्टी उपलब्ध नसल्याचे लक्षात येताच , त्यांनी तिव्र नाराजी व्यक्त केली व आगे पासून वाचलेले महत्त्वाचे दस्तावेज कागदपत्रे तत्काळ ऑनलाईन करण्याच्या सूचना देखील यावेळी मुख्यअधिकारी रामराजे कापरे व नायब तहसिलदार अजय पिंपरकर मंडळ अधिकारी पंजाबराव मेटांगळे तलाठी मुकेश काळे यांच्यासह महसूल कर्मचारी अधिकारी व नगरपालिका कर्मचारी अधिकारी , उपस्थित होते एकीकडे मेहकर नगरपालिकेच्या वतीने अतिक्रम काढण्याचे मोहीम सुरू पिढ्यान पिढ्या व्यवसाय करणाऱ्या व्यवसायिकांची दुकाने  तुटल्यामुळे सर्व व्यवसायिकांची नाराजी देखील दिसून आली त्यातच आता मेहकर नगरपालिकेच्या अभिलेख रेकॉर्ड रूमला आग लागल्याने व्यवसायिकांचे रेकॉर्ड देखील जळाले का अशी चर्चा देखील होती

या घटनेचा काहूर व्यवसायिकांच्या मनात निर्माण झाला आहे परंतु या आगीत अतिक्रम धारकांचे रेकॉर्ड जळाले नसल्याची माहिती मिळताच

व्यवसायिकांच्या मनात देखील शांतता झाल्याचे दिसून येते 


 *फायर सेफ्टी तपासणाऱ्या नगरपालिकेला उपलब्ध नाही*

*शहरातील फायर सेफ्टी साठीचे सर्व कामे त्यांची पाहणी फायर* *ऑडिट केल्यानंतर नॅशनल बिल्डिंग कोडच्या*

*मानकानुसार इमारतीमधील फायर सेफ्टी आहे का यांची पाहणी करून* *नाहरकत, देण्याचे काम नगरपालिका करते त्यासाठी प्रत्येक नगरपालिकांमध्ये* अग्निशामक *दल विभाग असतो व त्यालाही एक प्रमुख असतो तो प्रमुख सध्या* मेहकर  नगरपालिकेच्या इमारतीचे नूतनीकरणसुरू असून त्यांचे बजेट पाच कोटी आहे मात्र त्यात, फायर सेफ्टी सिस्टम नाही यावर बांधकाम अभियंता अजय मापारी यांना विचारले असता त्यांनी नूतनीकरण सुरू आहे त्यात फायर सेफ्टी सिस्टमाचे 

बजेट नाही मात्र आगीच्या  घटना पाहिल्यानंतर फायर सिस्टम बसवण्यात येणार असल्याचे सांगितले आहे मेहकर मधील शासकीय कार्यालयात दुसऱ्यांदा आग पैले   मार्च, एंडला ३१ मार्च २०२२ रोजी मेहकर नगरपालिकेच्या शेजारी तहसिल कार्यालयातील निवडणूक विभागाला अशीच आग लागली होती त्या आगीमध्ये उपविभागीय महसूल अधिकारी यांच्या व निवडणूक विभागातील कागदपत्रे जळून खाक झाली होती आता शासकीय कार्यालयातील आगीची दुसरी घटना आहे 

या घटनेने शहरातील नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होते,

सीसीटीव्ही कॅमेरा बाबत 

नगरपालिकेच्या इमारतीचे नूतनीकरण चालू आहे त्यामुळे सीसीटीव्ही कॅमेरे बंद ठेवण्यात आले आहे इमारतीच्या नूतनीकरण कामदरम्यान काही ठिकाणचे वायरिंग देखील काढण्यात आली आहे तर , काही ठिकाणी वायर मोकळे आहे कदाचित शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी असा अंदाज वर्तवल्या जात आहे

५ मे रोजी मेहकर नगरपालिकेच्या रेकॉर्ड रूमला आग लागल्याची चर्चा स्थानिक नागरिकांमध्ये होताना दिसून येते संपूर्ण व्यवसायिकांच्या मनात एकच हाळहाळ की आमचे या आगी मध्ये  महत्त्वाचे दस्तावेजत जळून खाकत  झाले नसतील  ना

अशी चर्चा संपूर्ण तालुक्यात व मेहकर शहरातील नागरिकांमध्ये होतांनी दिसून आली

Post a Comment

0 Comments