Type Here to Get Search Results !

मेहकर नगरपालिकेच्या रेकॉर्ड रूमला आग लागल्याने महत्त्वाचे दस्तावेज जळून खाक संशयात धूर विविध चर्चांना उधान

 


बुलढाणा-गजानन राऊत


पालिकेच्या रेकॉर्ड रूमला आग लागल्याने संपूर्ण तालुक्यातल्या नागरिकांमध्ये एकच चर्चा

मेहकर नगरपालिकेच्या अभिलेख विभाग रेकॉर्ड रूमला 

३मे च्या पहाटे ५ वाजता आग लागल्याने महत्त्वाचे दस्तावेज जळून खाक झाले आहे हे महत्त्वाचे दस्तावेज जळाल्याने मेहकर मध्ये एकच खळबळ उडाली या आगी मुळे संशयात दूर निर्माण झाला आहे तीन वर्षांपूर्वी ३१ मार्च २०२२ रोजी मेहकर नगरपालिकेच्या शेजारीच जुन्या तहसिलला आग लागली होती



त्यावेळी उपविभागीय महसूल अधिकारी कार्यालय व निवडणूक विभागाची कागदपत्रे जळाली होती आता पालिकेच्या रेकॉर्ड रूमला आग लागल्याने या चर्चेला उधान आला आहे नगरपालिकेचे रेकॉर्ड रूमला आग आणि त्यावेळी लागलेली आग शॉर्टसर्किटने लागल्याचे सांगितल्या जात आहे या आगीबाबत मेहकर स्थानिक नागरिकांमध्ये या आगीबाबत शंका ही व्यक्त केली जात आहे मेहकर नगरपालिकेने सध्या मागील काही महिन्यात जोरदार विकास कामे सुरू केले होते त्याप्रमाणे गावातील अतिक्रम सुद्धा काढले जात होते त्यामुळे मेहकर मध्ये

त्याचप्रमाणे, विकास कामे सुरू असताना मेहकर पालिकेच्या रेकॉर्ड रूमला आग लागल्याने तालुक्यात या चर्चेला उधाण आलं

अग्निशामक वाहन दुरुस्तीला



आग विझवण्यासाठी लोणार व चिखली येथील अग्निशामक दल बोलवण्यात आले होते परंतु मेहकर येथील अग्निशामक वाहन नादुरुस्त असल्यामुळे २मे रोजी दुरुस्तीला पाठवण्यात आले होते मागील दीड वर्षांपासुन मेहकर नगरपालिकेचे नूतनीकरण सुरू आहे परंतु नगरपालिकेचे सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्यामुळे ही चर्चा चांगलेच रंगलेले दिसून आली अग्निशामक दुरुस्ती वाहनाचे काम सुरळीत सुरू असताना ३मे च्या पाहाटे ५ वाजता, अभिलेख विभागाला आग लागली या घटनेत संपूर्ण कागदपत्रे जळून खाक झाली आहे ही आग विझवण्यासाठी नगरपालिका कर्मचारी अधिकारी व स्थानिक नागरिक यांनी शर्तीचे प्रयत्न केले मात्र नियंत्रण मिळवता आले नाही नगरपालिका चा सुरक्षारक्षक रमेश अवसरमोल यांना अभिलेख विभाग रेकॉर्ड रूम कडून धूर निघताना दिसला मात्र त्यांच्याजवळ मोबाईल नसल्याने त्यांनी महावितरण कार्यालयातील रखवालदार यांना उठवले आणि त्यांच्या मोबाईल वरून पालिकेच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क केला अभिलेख विभागाला आग लागलेली आहे त्यावेळी अभिलेख विभागात आग कमी प्रमाणात होती परंतु, दरवाजे व खिडक्या बंद असल्यामुळे ऑक्सिजन न मिळाल्याने आग वाढलेली नव्हती पण दरवाजे खिडक्या उघडताच आजचा भडका उडाला त्यावेळी जवळ फायर सिस्टीमन ही नवती नूतनीकरणाचे काम जोरदार सुरू होते पाच कोटीचे बजेट असलेल्या या कामात फायर सिस्टिम जवळ उपलब्ध , नसल्याने

लोणार व चिखली येथे अग्निशामक दल बनवण्यात आले होते आणि ही आग नंतर आटोक्यात आली

पण नागरिकांमध्ये या आगीला उधान आलं आहे

तरीसुद्धा महत्त्वाचे दस्तावेज कसे मिळतील याबाबत पालिका पुरेपूर कोशिश करेल अशी चर्चा देखील होताना दिसते

Post a Comment

0 Comments