बुलढाणा-गजानन राऊत
मेहकर , महाऑनलाईन सेवा केंद्रातील दाखल्यांच्या शुल्कात दुप्पट वाढ झाल्यामुळे
सामान्य नागरिकांच्या खिशाला बसणार फटका बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील महाऑनलाईन सेवा केंद्रावर कोणत्याही प्रकारचे प्रमाणपत्र किंवा दाखले काढायचे असल्यास, दुप्पटपणे दरवाढीचा सामना करावा लागणार आहे
महाऑनलाईन सेवेतील शुल्कात वाढ झाली आहे, ज्यामुळे नागरिकांना काही सेवांसाठी अधिक शुल्क भरावे लागणार आहे. या बदलांमुळे महाऑनलाईनद्वारे मिळणाऱ्या विविध सरकारी सेवा आणि प्रमाणपत्रे प्राप्त करण्यासाठी लागणारा खर्च पण सर्वसामान्य नागरिकांचं काय दुप्पट दराने वाढ झाल्याने सामान्य नागरिकांमध्ये नाराजी ची बाब आहे दरवाढी कमी करण्यात यावा अशी चर्चा देखील ग्रामीण भागातील नागरिक व शहरी भागातील नागरिक करीत आहे
कोणत्याही प्रकारची दाखले काढायचे असल्यास दुप्पटपणे शुल्कात वाढ
महा ऑनलाईन सेवा केंद्रामधून मिळणाऱ्या विविध प्रकारच्या दाखल्यांच्या शुल्कात शासनाने दुप्पट वाढ केली आहे त्यामुळे नागरिकांच्या खिशाला फटका बसणार आहे महाऑनलाईन केंद्रात पूर्वी अल्प दरात मिळणाऱ्या सेवा आता जवळपास दुप्पट दराने उपलब्ध होत आहेत याआधी केवळ ३४ रुपये शुल्क असलेल्या अर्जासाठी आता ६९ रुपये आकारले जात आहेत जातीचे प्रमाणपत्र उत्पन्न प्रमाणपत्र रहिवासी प्रमाणपत्र यासारख्या आवश्यक कागदपत्रांसाठी देखील शुल्कात लक्षणीय दुप्पट वाढ झाली आहे सध्या बारावीच्या निकाल जाहीर झाल्याने, विद्यार्थ्यांना पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी विविध प्रमाणपत्राची गरज आहे मात्र या शुल्कवाडी मुळे विद्यार्थी आणि पालकांना अनावश्यक आर्थिक वजन सहन करावे लागत आहे महाऑनलाईन सेवा केंद्र हे शासनाने ग्रामीण भागातील नागरिकांना तहसील किंवा जिल्हास्तरावर न जाता सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सुरू केले आहे मात्र आता त्याच सेवेचा लाभ, घेण्यासाठी अधिक किंमत मोजावी लागत असल्याने नागरिकांमध्ये संताप आहे या शुल्क वाडी विरोधात नागरिकांनी महाऑनलाईन पोर्टलवर नाराजी व्यक्त करत दर कमी करण्याची मागणी केली आहे
.jpeg)
Post a Comment
0 Comments