बुलढाणा गजानन राऊत
बुलढाणा जिल्ह्यात पोर्टलवर नोंदणी बंद ११वी साठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया पोर्टल बंद२६ मे पासून होणार नोंदणी सुरू जिल्ह्यात ३८९९६ प्रवेशांची प्रतीक्षा
अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत पहिल्या दिवशी ‘तांत्रिक अडचणी’; विद्यार्थ्यांसह शिक्षकांचाही उडाला गोंधळमहाराष्ट्रातील अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत तांत्रिक अडचणी आल्यामुळे प्रत्यक्ष नोंदणी आणि पसंतीक्रम नोंदवण्याची प्रक्रिया लांबणीवर पडली आहे. दोन दिवसांच्या सराव सत्रानंतरही वेबसाइटवर दुरुस्तीचे काम सुरू असल्याने विद्यार्थी आणि पालक ताटकळत आहेत. शिक्षण विभागाने लवकरच प्रक्रिया सुरळीत सुरु होईल असे आश्वासन दिले आहे.
यावर्षीपासून राज्य शासनाने ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवण्याचा घेतलेला निर्णय विद्यार्थी व पालकांचा मन:स्ताप वाढीवणारा ठरला आहे२१ मे पासून परवेशासाठी नोंदणी सुरू होईल असा राज्याच्या शिक्षण विभागाने केलेला दावा दुसऱ्या दिवशीही फेल ठरला असल्याचं चित्र दिसत आहे सलग दोन्ही दिवस पोर्टल बंद असल्याने एकही प्रवेश नोंद होऊ न, शिकल्याने विद्यार्थी व पालकांची धाकधूक वाढली आहे प्रक्रिया पूर्ण होत नसल्याने राज्यात दोन लाख ९१हजार ३९० विद्यार्थी प्रवेशा करिता उस्तूक आहेत
जिल्ह्यातील ३८ हजार ९९६ विद्यार्थी शिक्षणाला मोबाईल व सायबर कॅफेंवर पोर्टल ओपन करण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहेत दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर ११वी साठी, प्रवेश निश्चित करण्यास विद्यार्थी व पालक आतुर झाले आहेत सोयीच्या कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश मिळावा म्हणून पसंतीक्रम टाकण्यासाठी विद्यार्थी सज्ज झाले आहेत जिल्ह्यातील ३४४ उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी नोंदणी वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते ९९ व २० मेच्या सायंकाळी सहा वाजेपर्यंत सराव सत्र उपलब्ध होते २० मे च्या मध्यरात्री भरलेली माहिती पोर्टलवरून उडवली जाणार होती मात्र सरावावेळी पोर्टल प्रतिसाद देत नव्हते 21 मे पासून प्रवेश निश्चित सुरू होतील असा दावा करण्यात आला होता त्यानुसार मोबाईल व संगणकावर विद्यार्थी व पालक माहिती भरण्यासाठी डोळे लावून बसले होते परंतु २१ व २२तारीख उलटली तरीही पोर्टल बंदच होते त्यामुळे हजारो विद्यार्थी व पालकांमधून या अकरावी प्रवेश प्रक्रिया बद्दल नाराजी व्यक्त होत असून दहावी उत्तीर्ण झालेल्या मुला मुलींच्या कुटुंबात सध्या टेन्शन वाढल्याची अवस्था बघायला मिळत आहे २६ तारखेपासून सुरळीत होणार नोंदणी येत्या २६ मे पासून ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरळीत सुरू होईल असे शिक्षण विभागाच्या वतीने सांगण्यात आले
शिक्षण संचालकांनी दिली माहिती
सराव करतेवेळी राज्यातील पालक विद्यार्थी तसेच संबंधित अधिकारी कर्मचारी आणि शिक्षण तज्ञांनी मांडलेल्या सूचनाचा अंतर्भाव ऑनलाईन, प्रवेश प्रणालीमध्ये करण्यासाठी तांत्रिक बदल करण्यात येत आहे पोर्टलवर अर्ज भरण्याची सुरुवात विलंबाने होत असली तरी विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यास व पसंती कर्म नोंदविण्यास पुरेसे कालावधी देण्यात येईल प्रवेशाचे पोर्टल परिपूर्ण व उत्कृष्ट स्वरूपात उपलब्ध झालेले असेल, परवेशाची पोर्टल सुरू होण्याची वेळ ऑनलाईन दर्शविण्यात येईल तसेच विद्यार्थ्यांना ई-मेल व मोबाईल संदेशद्वारे कळविण्यात येईल तृप्तीसह अर्ज भरण्याची सुविधा देण्याऐवजी पोर्टल सुलभ व त्रुटी रहित करून सुरू , करण्याची कारवाई करण्यात येत आहे विद्यार्थी व पालकांनी गोंधळून जाऊ नये असे शिक्षण संचालक डॉक्टर महेश पालकर यांची प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे

Post a Comment
0 Comments