बुलढाणा:गजानन राऊत
दि. २१/०५/२०२५
मेहकर पशुवैद्यकीय डॉक्टरचा हलगर्जीपणा; गाय आणि वासरांचा तडफडून मृत्यू, ग्रामस्थ संतप्त
यावर कारवाई करण्याची मागणी सरपंच रतन मानघाले व
माजी सरपंच नंदाबाई पडघान व गावातील ग्रामस्थानाने केली अनेकदा पशुवैद्यकीय डॉक्टरांना फोन करून बोलावूनसुद्धा पशुवैद्यकीय डॉक्टर न आल्याने गाय आणि वासरांचा तडफडून मृत्यू झाल्याची संतापजनक घटना बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यात खंडाळा देवी येथे घडली आहे संतप्त ग्रामस्थांनी पशुवैद्यकीय डॉक्टर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे, कित्येक दिवसापासून खंडाळा येते गुरांच्या डॉक्टरांनी एकदाही या गावांमध्ये तोंड सुद्धा दाखीवले नाही व गावात डॉक्टर न
आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे रहिवासी नंदाबाई पडघान हे अनेक वर्षांपासून गाय पालन व्यवसाय करतात. मंगळवारी नेहमीप्रमाणे ते गाय चारण्यासाठी क्रीडा संकुल मध्ये गेले असता सकाळी ६च्या सुमारास गाईचे बाळंतपणा दरम्यान गईची तब्बेत बिघडल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यानंतर त्यांनी तातडीने सरपंच यांना बोलावले व मेहकर पंचायत समिती अतंर्गत येत असलेल्या पशुवैद्यकीय डॉक्टरांना फोन सुद्धा केले परंतु पशुवैद्यकीय डॉक्टरांनी यावेळी उडवाउडवीची उत्तरे दिले .
सकाळी गावातील नागरीकांनी फोन ,दौरे त्यांनी गाय व वासरांवर उपचार करण्यासाठी विनंती केली. व कित्येकदा फोन करून ही तसेच अनेकदा विनवण्या करूनही नंदाबाई पडघान यांच्या गाय व वासरांना बघायला आले नाहीत, तसेच त्यांनी औषधही सुचवले नाही, असे नंदाबाई पडघान यांनी सांगितले.आहे, पशुवैद्यकीय डॉक्टरांवर कारवाई होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही असा इशारा सरपंच यांनी दिला
*पशुवैद्यकीय डॉक्टरांनी दिले उडवाउडवीची उत्तरे निष्पाप जनावरांचा मृत्यू*
आज दिनांक २० मे रोजी सकाळी अंदाजे ६ वाजताच्या सुमारास खंडाळा देवी गावाजवळील क्रीडा संकुल परिसरात माजी सरपंच नंदाबाई पडघान यांची गाय प्रसूतीदरम्यान तडफडत असल्याचे निदर्शनास आले. ही माहिती मिळताच गावचे सरपंच रतन मानघाले यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली.यावेळी गावातील चंद्रकिर्ती पडघान, डॉक्टर अनिल गाभणे, मेटांगळे साहेब, डॉ. नागरीक, अमित जोशी संदीप ढोरे या वेळी. उपस्थित होते सर्वांनी मिळून तात्काळ पशुवैद्यकीय
डॉक्टरांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांच्याकडून टाळाटाळ करण्यात आली. वेळेवर वैद्यकीय मदत न मिळाल्यामुळे गाय व तिचे वासरू मृत्यूमुखी पडले.
या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, सरपंच रतन पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले सरकारी ढोर डॉक्टरांच्या दुर्लक्षामुळे ही दुर्दैवी घटना घडल्याचा आरोप केल्या जात आहे. सरपंच रतन मानघाले म्हणाले की, "गेल्या दोन ते तीन वर्षांपासून नाहीच तर गेल्या पाच वर्षांपासुन खंडाळा देवी येथे पशुवैद्यकीय डॉक्टरांनी भेट दिलेली नाही, तसेच गुरांचा इलाज करण्यासाठी सरकारी नही तर प्रावेट डॉक्टर बोलवावे लागतात याबाबत डॉक्टरयाची चौकशी करून पशुवैद्यकीय डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी, ग्रामस्थांनी व सरपंचानी केली आहे या येळी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामस्थांनी याबाबत पुढील पाठपुरावा करण्याचा निर्धार केला आहे.
याबाबतची पशुवैद्यकीय डॉक्टर यांच्यावर
कारवाई करण्याची मागणी सरपंच व गावकऱ्यांनी केली आहे

Post a Comment
0 Comments