Type Here to Get Search Results !

मोटरसायकल च्या डिकीतून एक लाख दहा हजार रुपये चोरट्याने केले लांब पास मेहकर येथील घटना

 



बुलढाणा गजानन राऊत


मेहकर येथील  जानेफळ फाट्या जवळील  हॉटेल तोरणा येथील बाहेर उभी असलेली मोटरसायकल मधील एक लाख दहा हजार रुपये गायप साबरा येथील शेतकऱ्यांचे मोटरसायकलच्या डिकी मध्युन एक लाख दहा हजार रुपये  चोरट्याने केले लांब पास 

ही घटना दुपारी २:३० वाजताच्या सुमारास घडली आहे मेहकर पासून जवळच असलेल्या ग्रामीण भागातील साबरा येथील शेतकरी उत्तम पुंजाजी दुगाने वय वर्ष( ४३) 

राहणार सागरा तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा यांनी मेहकर येथील भारतीय स्टेट बँक कृषी शाखेमधून यांच्या खात्यातून जमा झालेल्या१ लाख १५ हजार रुपये मधून १ लाख १०हजार रुपये काढून ते आपल्या मोटरसायकल च्या, 

डीपी मध्ये टाकून घराकडे जाण्याकरिता रवाना झाले होते मोटरसायकल क्रमांक एम .एच.२८ बी.टी .३३१३ या

मोटरसायकल च्या  डिकीतून हॉटेल तोरणा समोर गावातील परमेश्वर ठोकरे भेटले असतांना, त्यांना चहा पाजण्यासाठी ते हॉटेल तोरणामध्ये गेले व परत आले असता मोटरसायकलच्या डीकि मध्ये ठेवलेले एक लाख दहा हजार रुपये डीकीत नसल्याचे दिसून आले त्यांनी तातडीने मेहकर पोलीस स्टेशनला फिर्याद नोंदवली आहे मेहकर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे पुढील तपास पोहेका सुरेश काळे करीत आहे

Post a Comment

0 Comments