बुलढाणा : गजानन राऊत
बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या कारला, ट्रक ची धडक हा अपघात मध्यरात्री झाल्याची माहिती, सूत्रांकडून देण्यात आली आहे मद्यधुंद ट्रक चालकाकडून धडक रविकांत तुपकर हे लातूर वरून जालना कडे निघाले होते रात्रीच्या वेळी मद्धुंन असलेल्या ट्रक ड्रायव्हर कडून शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या इनोव्हा कारला मागुन जोरदार धडक दिल्याने मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत दरम्यान हा अपघात की घातपाताचा प्रयत्न याचा तपास पोलीस करीत आहे
शेतकरी नेते रविकांत तुपकर सध्या कर्जमुक्तीच्या मागणीवर राज्यभरात आक्रमक आंदोलन सुरू केलेले, तुपकर यांच्या कारला रविवार दि.18 मे रात्री 12 ते 1 वाजेच्या दरम्यान वाशी तालुक्यातील पारगाव टोल नाक्यावर हा अपघात झाला मद्यधुंद अवस्थेतील ट्रक ड्रायव्हरने रविकांत तुपकर यांच्या इनोव्हा कारला मागून धडक दिली, सुदैवाने यात कोणाला, जीवित हानी व गंभीर दुखापत झाली नाही गाडीतील दोघांना किरकोळ मार लागला आहे रविकांत तुपकर यांना लोक वर्गणीतून लोकांनी दिलेली लोखरथ नामक विनोव्हा क्र. MH28 BQ 9999 पारगाव टोल नाक्यावर थांबलेली असताना अचानक मागून भरधाव वेगाने आलेल्या साखरनेणे भरलेल्या ट्रकने दिली ट्रक क्रमांक MH 44 U14 44)
अत्यंत मद्दधुंद अवस्थेत होता
मागील सीटवर बसलेले लोक अक्षरश, पुढे फेकल्या गेले या अपघातात सुदैवाने रविकांत तुपकर यांना कोणतीही दुखापत झालेली नाही, ते पूर्णच सुरक्षित आहेत मात्र गाडीत त्यांच्यासोबत असलेले पीए कार्तिक सवडतकर व राजाराम जाधव यांना थोडा मार लागला आहे तर चालक अजय मालगे व तुकारांचे सहकारी गजानन नाईकवाडे यांना कोणतेही दुखापत झालेली आहे ट्रक चालक हा दारूच्या नशेत होता अपघातानंतर तो सारखे खोटे बोलत होता व माहिती लपवण्याचा प्रयत्न सुध्दा करत होता अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली परिस्थितीचे गांभीर्य ओळखून चालकासह ट्रक मधील किन्नर ला पोलिसांनी ताब्यात घेतले असून साखर ने भरलेला, ट्रक ही पोलिसांनी जप्त केला आहे हा अपघात होता की घातपाताचा प्रयत्न याबाबत अनेक शंका उपस्थित होत असून पोलिसांकडून दोन्ही बाजूनी सखोल तपास सुरू करण्यात आला आहे या प्रकरणाचा तपास वाशी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संग्राम थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे रविकांत तुपकर हे राज्यात शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीच्या प्रश्न दौऱ्यावर आहेत त्यांनी नाशिक परभणी बीड येथील दौरे पूर्ण केले असून आज आंबेजोगाई तालुक्यातील देवळा येथे कर्जमुक्ती एल्गार सभेला संबोधित केले सभा आटपून त्यांनी लातूर जिल्ह्यातील तांदूळजा येथे कार्यकर्त्यासोबत स्नेह भोजन घेतले, व त्यानंतर रात्री 11 वाजता जालन्याच्या दिशेने मार्गस्थ झाले असताना वाशीजवळ हा अपघात घडला, हा अपघात की घातपात असा प्रश्न कार्यकर्त्यांकडून होतांना दिसून येत आहे या अपघातामुळे संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये राज्यभर मोठी खळबळ उडाली होती मात्र तूपकर हे पूर्णतः सुरक्षित असल्याचे समजताच सर्व कार्यकर्त्यांनी सुटकेचा निश्वास घेतला, या अपघाताचे गांभीर्य लक्षात घेतात संबंधित यंत्रांकडून सखोल सर्व बाजूंनी चौकशी व्हावी अशी मागणी क्रांतिकारी संघटनेच्या कार्यकर्त्याकडून होत आहे ट्रक चालक संभाजी डोंगरे पंढरपूर यांच्यावर वासी पोलीस स्टेशनला कलम 281कलम 186अन्वये गुन्हा दाखल केला आहे, ही कायदेशीर प्रक्रिया सकाळी पाच वाजेपर्यंत चालू होती, रविकांत तुपकर हे सुखरूप असल्याची माहिती कार्यकर्त्यांना मिळताच सर्व कार्यकर्ते निवांत असल्याची माहिती सूत्रांकडून दिल्या जात आहे पण हा अपघात की घातपाताचा प्रयत्न उपस्थित झाला आहे कार्यकर्त्याकडून पोलिसांकडून सखोल चौकशी करण्याची मागणी सध्या सुरू आहे
रविकांत तुपकर यांच्या कारला अपघात
धाराशिव: गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर अपघातांचं प्रमाण वाढल्याचं चित्र आहे. अशातच शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या वाहनाला अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.धाराशिव जिल्ह्यातील वाशी पारगाव टोल नाक्याजवळ मद्यधुंद ट्रक चालकाने तुपकर यांच्या इनोवाला दिली पाठीमागून धडक दिल्याने हा अपघात झाला आहे.सुदैवाने कुणालाही दुखापत झालेली नाहीअंबाजोगाई तालुक्यातील देवळा येथील कर्जमुक्ती आंदोलनाच्या सभेला संबोधित करून तुपकर लातूर जिल्ह्यात जात असताना हा अपघात झाला आहे. पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतलं असून चौकशी सुरु केली आहे.तुपकरांच्या कार चालकाने दिलेल्या पोलिस तक्रारीनुसार, बीडकडे जाणाऱ्या लेनमध्ये टोल भरण्यासाठी थांबलो. तेव्हा पाठीमागून त्यांच्या ईनोव्हा कारला कोणीतरी जोरदार धक्का दिल्याचे जाणवले व मोठा आवाज आला व गाडी थोडी पुढे सरकली.त्यामुळे काय झालं हे पाहण्यासाठी गाडीतुन खाली उतरून मागे पाहिले असता आमच्या गाडीला पाठीमागुन ट्रकने धडक दिल्याचे लक्षात आले. ट्रकमध्ये एक क्लिनर व ड्रायव्हर बसलेले होते.त्यानंतर रविकांत तुपकर हे ट्रकचे चालकांकडे त्याचे नाव गावाबाबत विचारणा करत असता त्याने अडखळत्या आवाजात त्याचे नाव संभाजी विटठल डोंगरे रा, संभाजी चैक पंढरपुर असे असल्याचे सांगितले.



Post a Comment
0 Comments