बुलढाणा गजानन राऊत
बुलढाणा जिल्ह्याच्या पेनटाकळी प्रकल्पाला मिळाली नवी दिशा
४०१ कुटुंबाचे घराचे स्वप्न होणार साकार, तीन दशकांच्या लढ्याला आले यश १९९८ पासून, प्रलंबित होता पेनटाकळी प्रकल्प प्रश्न आता शासनाच्या मान्यता नंतर एकूण सात हेक्टर ८२आर जागेवर पुनर्वसन आराखडा, तयार करून समाजनिहय प्लॉट वाटपाची प्रक्रिया राबवण्यात आली गेल्या कित्येक वर्षापासून प्रलंबीत असलेल्या, प्रकल्पाला मिळाली नवी गावातील ४०१ लाभार्थ्यांना हक्काचे प्लॉट प्रदान करण्यात आले आहेत, केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव व ठाकरे गटाचे आमदार सिद्धार्थ खरात त्यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे त्यामुळे आता ग्रामस्थांच्या घराची स्वप्नपूर्ती दृष्टीपथात आली आहे, त्यामुळे आता ग्रामस्थानाच्या घराची चिंता मिटली आहे पुनर्वसना संदर्भातील, या मागणीसाठी गावकऱ्यांना १९९८ पासून, वेळोवेळी आंदोलना केली होती १२ दिवसाचे उपोषणही गावठाण हादवाड त्याच्यासाठी केले होते
त्यावेळी आमदार खरात यांनी याबाबत लक्ष वेधले होते व, प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला त्यांच्या पुढाकारामुळे हे उपोषण मागे घेण्यात आले होते शनिवारी पेनटाकळी येथे घेण्यात आलेल्या एका कार्यक्रमात सर्व ग्रामस्थांना प्लॉटचे वाटप करण्यात आले शासनाच्या मान्यतेनंतर एकूण सात हेक्टर ८२ आर जागेवर पुनर्वसन आराखडा तयार करून समाजनिहय प्लॉट वाटपाची प्रक्रिया राबवण्यात आली या ऐतिहासिक प्रसंगी आमदार खरात यांनी गावात जाऊन ग्रामस्थांना संवाद साधला तब्बल तीन दशकापासून हा प्रश्न रखडलेला होता शासकीय नियम व कायद्यातील तांत्रिक अडचणीमुळे हा प्रश्न मार्गी लागत नव्हता त्या शेवटी सुवर्णमाध्य काढून हा प्रश्न मार्गी लावण्यात आला आहे समोपचारातुन हा प्रश्न निकाली निघाल्याने ग्रामस्थांना मध्ये समाधान व शांततेचे वातावरण आहे अखेर ग्रामस्थानाचा घरांचे प्रश्न निकाली लागले या कार्यक्रमाला केंद्रीय आयुष्य कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव
आमदार सिद्धार्थ खरात तहसीलदार निलेश मडके उपजिल्हा प्रमुख प्रा. आशिष रहाटे तालुका प्रमुख निंबाजी पांडव . शहर प्रमुख किशोर गारोळे युवा सेनेचे आकाश घोडे यांच्यासह विविध प्रशासकीय अधिकारी ग्रा. पं. प्रतिनिधी व ग्रामस्थ या वेळी उपस्थित होते


Post a Comment
0 Comments