मेहकर : गजानन राऊत
जिल्ह्यात पुन्हा अवकाळी तांडव
दि, १६ मे च्या १२च्या दरम्यान उन्हाचा पारा प्रचंड प्रमाणात चढत असताना अचानक ढगाळ वातावरण
मेहकर मध्ये विजांचा कडकडाड वारासह पुन्हा एकदा जोरदार पावसाने झोडपले शुक्रवार दि, १६- मे रोजी बाराच्या दरम्यान प्रचंड प्रमाणात ऊन असताना अवकाळी पावसाने हजेरी लावली वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने थैमान घातला राज्यात गेल्या दीड महिन्यापासून तापमानामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली असून उष्णतेच्या झळांने नागरिक, हैराण झाले असून विदर्भातील बहुशांत शहरांमध्ये तापमानाचा पारा चांगलाच चढला अनेक जिल्ह्यातील तापमान ४५ अंश सेल्सिअस, इतके वाढले आहे त्या पलीकडेही वाढल्याचे दिसून आले पण गेल्या काही दिवसापासून वातावरणामध्ये तापमानात घट झाली असून ढगाळ वातावरणासह अवकाळी पावसाने वाऱ्यासह मेहकर शहरामध्ये जोरदार पाऊस, यामध्ये काही ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे आंबा कैरीचे मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झाले आहे सकाळी वादळी वारा दुपारी उणाच्या पाऱ्यात पाऊस जिल्ह्यात चार-पाच दिवसापासून अवकाळी पावसाने तांडव घातला आहे पावसाच्या तुलनेत वाऱ्याचा वेग जास्त होता. या दरम्यान मेहकर व लगतच्या गावात पाणी वाऱ्याच थैमान.तालुक्यातील अनेक गावांत अवकाळी पावसाने हजेरी लावली.
दुसरीकडे
विजेच्या कडकराडात विज पडून शेतकऱ्यांचा मृत्यू
दुखद बातमी मेहकर तालुक्यातील चायगाव येथील रहिवासी , शेत शिवारात गट नंबर ५४२ या शिवारात अर्जुन पुंडलिक रोही हे एका आंब्याच्या झाडाखाली बसलेले असताना अचानक वीज कोसंळी आणि यात दुखद घटना घडली या घटनेत वृद्धांचा मृत्यू झाला आहे तर पत्नी बचावली हे आपल्या पत्नीसह हे दोघे शेतात मक्का काढण्यासाठी गेले होते दरम्यान २वाजून ३० मिनिटांनी ढगांचा गडगडाट व विजांचविजांच्या कडकडाटासह वारसह पावसाला सुरुवात झाली पावसात भिजू नये म्हणून दोघेही एका आंब्याच्या झाडाच्या असऱ्याने आले परंतु जोरदार पाऊस वाढत असल्यामुळे ते हाकेच्या अंतरावर तांड्याकडे निघून गेले व मग त्याचे कंस भिजू नये म्हणून जमा करण्यासाठी मूर्तकांची पत्नी लक्ष्मीबाई व मृतक अर्जुन यांच्यापासून थोडे अंतरावर गेली तेवढ्यात वारा व पाणी आणि ढगांच्या कडकडाटासह आंब्याच्या झाडावर वीज कोसळली डोळे दीपवणारा आगीचा गोळा आंब्याच्या झाडावर पडताच मूर्ततांची पत्नी लक्ष्मीबाई यांचे डोळे दिपले व क्षणार्धात होताचे नव्हते झाले आणि हा क्षण पाहून लक्ष्मीबाई यांनी मोठ्याने अंहबाडा फोडला या घटनेचा आरडाओरडा ऐकून तांडा वरील लोकांनी घटनास्थळाकडे धाव घेत या घटनेची संपूर्ण माहिती, मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन या घटनेचे पंचनामे केले व उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह स्थानिक मेहकर ग्रामीण रुग्णालय येथे रवाना केले मृतक अर्जुन रोही यांचे भाऊ एकनाथ पुंडलिक रोही यांच्या फिर्यादीवरून मेहकर पोलिसात मार्ग दाखल करण्यात आला पुढील तपास ठाणेदार वेंकटेश्वर आलेवार
यांच्या मार्गदर्शनात पोलीस अंमलदार रामेश्वर कोरडे हे करीत आहे या घटनेने संपूर्ण चांयगाव परिसरात शोकांतिका पसरली आहे


Post a Comment
0 Comments