बुलढाणा :गजानन राऊत
बुलढाणा जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हा परिषद शाळांना जल्लोषात सुरुवात झाली.शाळां बाहेर मिरवणुका,ढोल ताशे, गुढ्या,आरत्या... हे सर्व पाहून क्षणभर मन आनंदित झालं.पण त्या गोंगाटाच्या पार्श्वभूमीवर एका दृश्याने काळजाला भिडलं –
शेतकऱ्याचा मुलगा बैलगाडीतून शाळेत जात होता...
तो बाप – दिवसरात्र राबणारा,उध्वस्त शेती सांभाळणारा,आपल्या लेकराचं भविष्य घडवण्यासाठी शरीर घासणारा,आजही त्याच्याकडे एवढेही पैसे नाहीत की मुलाला सायकल,बाइक काय,शाळेपर्यंत सोडण्यासाठी एक छोटं वाहन तरी असावं.मग प्रश्न पडतो
हेच का ते ‘समावेशक शिक्षण’हेच का ते ‘समतेचं भारत’ सोशल मीडियावर आपले लोकप्रतिनिधी झगमगते फोटो टाकतात,गोरगरिबांच्या मुलांचे स्वागत करतात,जिल्हा परिषद शाळांचा जयजयकार करतात…
पण त्याच वेळी आपल्या स्वतःच्या मुलांना इंटरनॅशनल स्कूलमध्ये पाठवतात,विमानाने विदेशात शिक्षणासाठी पाठवतात.हा दुटप्पीपणा थांबला पाहिजे.आमच्या बापाला विमान नको,पण आपल्या मुलाला शिक्षणासाठी समान संधी हवी"स्वागताच्या मिरवणुका थांबवा आणि बैलगाडीवरून येणाऱ्या त्या बापाच्या अश्रूंना उत्तर द्या.
मी सर्व समाजाला,शेतकरी बांधवांना,पालकांना आणि सर्वसामान्य जनतेला विचारतो,
"आमच्या मुलांसाठी बैलगाडी,तुमच्या मुलांसाठी विमान…हा न्याय आम्ही अजून किती काळ सहन करायचा?"यातून बदल व्हायला हवा.शासनाने,समाजाने आणि स्वतःच्या पदावर बसलेल्या प्रत्येक लोकप्रतिनिधींनी आत्मपरीक्षण करायला हवं.
प्रशांत ढोरे पाटील
सामाजिक कार्यकर्ते
माझा बाप बैलगाडीतून जातो,पण त्याचं मनं आभाळाएवढं मोठं आहे.
तुमचं विमान एक दिवस कोसळेल,
पण त्याचा स्वाभिमान कोसळणार नाही

Post a Comment
0 Comments