Type Here to Get Search Results !

जि .प.मराठी उच्च प्राथमिक शाळा खंडाळा (देवी)येथे , विद्यार्थ्यांची ट्रॅक्टर मध्ये मिरवणूक पाठयपुस्तकासह गणवेश प्रवेशोत्सवासाठी शाळा सजल्या स्कूल चले हम.

 

 

बुलढाणा गजानन राऊत







खंडाळा (देवी)

प्रवेशोत्सावासाठी जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा सजल्या

स्कूल चले हम, पाठ्यपुस्तकासह गणवेशाचेही वाटप करण्यात आले

दोन महिन्यापासून ओस पडलेल्या शाळा उघडल्या चिमुकल्याच्या निरागस किळबीळाटाने खंडाळा देवी,येथील शाळेचा परिसर चांगलाच गुंजला आहे लहान लहान पावलाचा आज शाळेचा पहिला दिवस आनंददायी



प्रसन्न व उत्साहपूर्व जावा म्हणून 

जिल्ह्यातील शाळांनी विद्यार्थ्यांच्या परवेशोत्सवाची जयत तयारी केली




 यानिमित्ताने ग्रामीण भागातील व शहरी भागातील शाळांची रंग रांगोटी करण्यात आली तर काही शाळांनी नवीन उपक्रम दाखवून, मुलाची नवीन पद्धतीने पायाचे ठसे घेऊन दमदार जंगी स्वागत केले शाळेचे प्रवेश दार देखील फुलांनी सजवण्यात आले ग्रामीण भागात प्रत्येक शाळेत विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले दरम्यान शाळेचा पहिल्याच दिवसी विद्यार्थ्यांना पाठ्य पुस्तके व गणवेश वितरणाचे नियोजनही शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे 

जिल्ह्यात जिल्हापरिषद नगर परिषद नगरपालिका खाजगी अनुदानित आशा दोन हजाराउन अधिक शाळा असून या शाळांच्या नवीन शैक्षणिक

सत्राला सुरवात सोमवार दि. 23 जून 2025 पासून सुरवात होत आहे शाळेचा उंबरठा प्रथमच वलांडणाऱ्या लहानग्यांना शाळा हवीहवीशी वाटावी म्हणून आवश्यक वातावरण निर्माण करण्याच्या सूचना यापूर्वी शिक्षण विभागाने , शाळा प्रशासनाले दिल्या आहे त्यानुसार प्रभात फेरी विद्यार्थ्यांचे फुल देऊन व मोफत पाठ्यपुस्तके देऊन स्वागत करण्याचे कर्तव्य जबाबदारी शाळेय शिक्षकांवर सोपवली आहे याशिवाय मध्यान्ह भोजनात गोड पदार्थांचा समावेश करण्याचे देखील सुचवले आहे

हेच कर्तव्य शिक्षक शिक्षिकांनी देखील पार पाडले आहे 

लहान लहान पावलाचे जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेत प्रवेश उत्साहासह धूमधम स्वागत करण्यात आले

बुलढाणा जिल्ह्याच्या मेहकर तालुक्यातील खंडाळा (देवी) 

येथील जिल्हा परिषद शाळेचा पहिला दिवस आणि शाळेये प्रवेश मोठ्या उत्साह, वातावरणामध्ये संपन्न झाला विद्यार्थ्यांचे अभेक्षण करून विद्यार्थ्यांचे पायाचे ठसे उमटवून हातामध्ये फलक घेऊन नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले आणि विद्यार्थ्यांची खंडाळा (देवी) गावातून ट्रॅक्टर , मधून जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली विद्यार्थ्यांना शाळेय गणवेश बुट व पुस्तके वही पेन शाळेय साहित्याचा वाटप करण्यात आले आहे या वेळी सर्व पालकांनी देखील शाळेकर्ता अनमोल वेळ देउन हकार्य केले या मिरवणुकीत विद्यार्थी , व पालकांनी देखील सहभाग नोंदवला आहे या वेळी , गट ग्रामपंचायत चे सरपंच रतन पाटील मानघाले. शाळेय शिक्षण समिती अध्यक्ष दिपक मानघाले .बी.बी. हिवराळे साहेब, ग्रामसेवक बावणे मॅडम .शाळेय शिक्षण समिती उपाध्यक्ष कडुजी राऊत. 

 जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक, जगन्नाथ गायकी सर ढवळे सर  

चव्हाण सर पाटील सर थेटे सर, बोडखे सर पत्रकार गजानन राऊत, जिल्हा परिषद 

शिक्षिका , सौ. ताजने मॅडम,कु.बर्वे मॅडम ,अंगणवाडी सेविका वंदना पोपळघट मॅडम , मनिषा अंभोरे मॅडम

सिमा बोराडे मॅडम ,रेखा मानघाले मॅडम, शोभा राजपूत मॅडम, तसेच गावकरी मंडळी, भिवाजी ढोरे, संदीप मानघाले, धनंजय राऊत.सागर मानघाले,राजु शिंदे,संदीप वानखेडे गुनाजी जाधव, गजानन आवचार ,अजय डोंगरे. अरूण काळे, प्रकाश काळे, दत्तात्रय मानघाले,लक्ष्मण जाधव, गणेश डोंगरे, संतोष ढोरे, शालीकराम नेमाडे या सह, अनेक मान्यवर पत्रकार व

 गावातील पालक मंडळी ही उपस्थित होते


 ३० जूनपासून दुपारच्या सत्रात शाळा 

विदर्भात राज्य मंडळाच्या शाळा २३ते २८ जुन पर्यंत सकाळ सत्रात ७ते ११:४५ या वेळेत भरणार आहेत तर ३० जून पासून दुपारच्या सत्रात शाळा नियमित सुरू करण्याचे निर्देश राज्याचे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. श्रीराम पानझडे. व प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी दिले आहेत. 

 तालुकानिहाय लाभार्थी विद्यार्थी संख्या

 मोफत पाठ्य पुस्तके वितरणाची तालुकानिहाय लाभार्थी विद्यार्थी संख्या याप्रमाणे आहे बुलढाणा, २५,६८४ चिखली२७, ८८७ दे. राजा. १४,०५१ सिं. राजा, १५,०२३ लोणार, १४,६२३मेहकर २६,००३ खामगाव, २८,३७७ शेगाव,११,९८८ संग्रामपूर , १४,८७५ ज. जामोद, १७,६८७ नांदुरा १५,८३५ मलकापूर १६ , ८६७ मोताळा , १६,३०७


 दोन लाख ४४हजार विद्यार्थ्यांना मिळणार पाट्य पुस्तके

 शिक्षणाचा दर्जा उंचावणे गळतीचे प्रमाण कमी करणे आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढवणे या हेतूने समग्र शिक्षण आभियानांतर्गत

जिल्ह्यातील दोन लाख ४४ हजार २६८ विद्यार्थ्यांना सुमारे १५ लाख १७ हजार पुस्तकांचे वितरण करण्यात येणार आहे शाळांमधील उपलब्ध पटसंख्येनुसार पुस्तके वितरीत करण्याचे, नियोजन गटशिक्षण अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे

Post a Comment

0 Comments