शेतकऱ्यांनी केली पेरणीला सुरुवात
आता शेतकऱ्यांना पिक कर्जाची प्रतीक्षा
बुलढाणा:गजानन राऊत
मेहकर: शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण
जिल्ह्यात यंदा पावसाने मे महिन्यातच चांगलीच हजेरी लावल्याने जिल्ह्यात खरीप पेरणी जूनच्या पहिल्या आठवड्यातच सुरुवात झाली आहे. यंदा आतापर्यंत
गेल्या काही दिवसांत जिल्ह्याच्या काही भागांत पाऊस, काही भागात उघडीप असे वातावरण होते. पण आतापर्यंतच्या पावसाचा विचार करता, जिल्ह्यात पुरेसा पाऊस झाला आहे. आता चांगला वाफसा मिळाल्याने शेतकऱ्यांनी पूर्वमशागतीसह खरीप पेरण्यांना सुरुवात केली आहे. पूर्व मानसुन पावसाने लावलेली दमदार हजेरी व येत्या काळातही चांगला पाऊस पडण्याचा अंदाज यामुळे यंदा खरिपाच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे.बुलढाणा जिल्ह्याचा मेहकर तालुक्यातील खंडाळा देवी येथे शेतकर्यांनी केली पेरणीला सुरवात काही शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर पेरणी यंत्राणे केली सुरवात तर काही शेतकऱ्यांनी जुनी परंपरा कायम ठेवली चाड्यावर मूठ धरली आहे. खरीप हंगामापुर्वी शेतकरी शेतात उन्हा ताहनात राबुन काडीकचरा वेचून जमिनीची मशागत करून जमीन भुसभुसीत करून ठेवतो. माती मुलायम झाल्यामुळे पाउस त्यात मुरते. अशा जमिनीवरील पेरणी बहुदा वाया जात नाही. अधिक उत्पादन देणारे बीयाणे , जमिनीत झालेला ओलावा व पावसाची अनुकुलता असल्यास पेरणी हा शेतकर्यांच्या जीवनातील एक आनंदी क्षण असतो. याच आनंदात शेतकर्यांच्या भविष्यातील आशादायक स्वप्ने सामावलेली असतात.पुर्वी वेळेवर पाऊस पडायचा. त्यामुळे शेतकर्यांना फारशी धाकधूक नसायची , बहुतांश शेतकर्यांकडे घरचेच सोयाबीन उडीद मुंग मग जवारी बियाणे असायचे पहिले आसा पावसाचा लहरीपणा नसायचा, परंतु आता सर्वच बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील चित्र बदलुन गेले आहे.
पाऊस पडेल, या आशेवर शेतकर्यांनी पेरणीला प्रारंभ केला आहे. दुबार पेरणीचे संकट ओढावणार नाही, अशी वरुणराजाला विनवणी केली जात आहेत जिल्ह्यात
*उद्दिष्टाच्या केवळ १८ टक्केच पैशाचा पीक कर्जाचा वाटप पैशाची जुळवाजुळव करताना शेतकऱ्यांची आधीच दमदाटी झाली आहे*
त्यातच महागडे बियाणे , पैहिलेच गगनाला भिडलेल्या रासायनिक खतांच्या किंमती , व शेतीसाठी मजुरांची टंचाई आणि बदलत्या वातावरणात पावसाचा लहरीपणा , निसर्गाचा बिघडलेला समतोल यामुळे शेतकर्यांसाठी पेरणी ही एक जोखमीची बाब झाली आहे. कधी- कधी अनुकुल परिस्थिती नसतांनाही शेतकर्यांना पेरणी करावी लागते. कधी पेरणी साधते तर कधी ती वाया जाते. पावसाच्या भरोशावरच शेतकर्यांची सर्व कदार असते. पाऊस परेल या आशेवर सध्या पेरण्या केल्या जात आहेत शेतीपासून ते घरी पीक येईपर्यंत शेतकऱ्यांमध्ये धाकधूक नेहमीच असते , परंतु संकट कोणतेही असो शेतकऱ्यांना कसं का होईना पण शेतीसाठी कसरत करावीच लागते आणि पेरणीसाठी तर मेहनत सुद्धा करावी लागते, यावर्षी बैल जोडी टिफणीने कमी टक्के शेतकरी पेरणी करतांना दिसून येत आहे पूर्वीच्या काळात ट्रॅक्टर पेरणी सारखे यंत्र नसायचे कमी प्रमाणात , हे यंत्र साहित्य असायचे परंतु सर्जा राजाला खूप मशागत कराव लागायची पण आता जूनच्या दुसऱ्या आठवड्यातच शेतकऱ्यांनी ठिफण धरली पेरणीला चांगल्याच प्रकारे सुरुवात केली
अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी मशागतीची कामे पूर्ण केली आहेत, तर काही ठिकाणी ती अंतिम टप्प्यात आहेत. पावसाळ्याच्या सुरुवातीला पेरणीसाठी चांगली स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. विस्तृत माहिती पेरणीची तयारी
बुलढाणा जिल्ह्यात खरीप हंगामासाठी पेरणीची लगबग सुरू झाली आहे. मशागतीची कामे:
अनेक शेतकऱ्यांनी शेतीची मशागत पूर्ण केली आहे, तर काही शेतकरी अंतिम टप्प्यात आहेत पेरणीसाठी अजूनही शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा आहे

Post a Comment
0 Comments