बुलढाणा: गजानन राऊत
पतीच्या बलिदानाला न्याय मिळावा म्हणून पत्नीचे आमरण उपोषण
आज माझ्यावर उपोषण करण्याची वेळ केवळ प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे आली पण सरकारला हात जोडून विनंती माझ्यावर बलिदान द्यायची वेळ येऊ देऊ नका फक्त माझ्या मुलासाठी मला न्याय द्या
स्वर्गीय कैलास नागरे यांनी शेतीला पाणी मिळावे म्हणून शिवनी आरमाळ येथे धरण क्षेत्रामध्ये सहा दिवस अन्नत्याग आमरण उपोषण केले होते. पण त्यांच्या उपोषणाची व निवेदनाची दखल प्रशासनाने व्यवस्थितपणे न घेतल्यामुळे हातबल होऊन न्याय मिळत नसल्याने अखेर शेवटी कैलास नागरे यांनी पाणी मिळावे म्हणून बलिदान दिले त्या बलिदानाच्या वेळेस लिहून ठेवलेल्या सुसाईड नोटमध्ये काही प्रामुख्याने धक्कादायक माहिती समोर आली. त्यामध्ये १४ गावांना खडकपूर्णा प्रकल्पाचे पाणी द्या. माझ्या मुलांना व राज्य सरकारने दत्तक घेऊन त्यांना आधार द्या अशा अनेक मागण्या त्यामध्ये करण्यात आल्या होत्या कुठल्याच प्रकारे राज्य सरकारकडून त्यावेळेस दखल घेत जात नव्हती म्हणून संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यातील पत्रकार बंधूंनी आवाज उठवला आणि शेतकरी नेत्यांनी आणि सर्वच राजकीय विभागांमध्ये सरकार विरोधात असंतोष दिसू लागला म्हणून त्याच अनुषंगाने माननीय मुख्यमंत्री साहेबांनी विधानसभेमध्ये ऑन रेकॉर्ड जाहीर केले होते की मुलांचे शिक्षणासाठी दत्तक घेऊन त्यांचा शिक्षणाचा सर्व खर्च राज्य सरकार करेल पण नुसती हवेतच घोषणा झाली. माननीय मुख्यमंत्री साहेबांनी घोषणा केल्यानंतर चार महिने पूर्ण झाले तरी त्या कुटुंबाला कुठल्याच प्रकारे न्याय मिळाला नाही श्रीमती स्वाती नागरे यांनी अखेर अन्नत्याग आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला. अनेक वेळा तहसील कार्यालय मान्य तहसीलदार साहेबांशी भेट घेऊन व फोनवर चर्चा करून सुद्धा काहीच निष्पन्न झाले नाही म्हणून निवेदन देऊन निवेदनामध्ये अनेक धक्कादायक खुलासे त्यांनी केले जर मला बलिदान देऊन न्याय मिळत असेल तर मी तेही सुद्धा बलिदान द्यायला तयार आहे. प्रशासनाला माझं सुद्धा बलिदान घ्यायचं का हा जबाब नागरे ताईने त्यांच्या निवेदनामध्ये राज्य सरकारला विचारला सिंदखेडराजा येथे उपविभागीय कार्यालय देऊळगावराजा येथे तहसील कार्यालय आणि अंधेरा पोलीस स्टेशन यांना निवेदनाद्वारे माहिती दिली आणि अखेर आज २१ जुलै रोजी अकरा वाजता पतीच्या प्रतिमेचे पूजन करून श्रीमती स्वातीताई नागरे अखेर अन्नत्याग आमरण उपोषणाला बसल्या आता तरी राज्य सरकार या स्वातीताई नागरे यांच्या उपोषणाकडे कशा पद्धतीने पाहणार आहे. आणि हे उपोषण कशा पद्धतीने हाताळणार आहे याकडे संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे स्वातीताई नागरे यांच्या प्रमुख मागण्या माझ्या १४ गावांना शेतीसाठी पाणी द्या. माझ्या मुलांना दत्तक घेतल्याची व्याख्या तुम्ही मला लेखी स्वरूपात मुख्यमंत्री साहेबांच्या हस्ताक्षरात सहित मला माहिती द्या. मुलांच्या शिक्षणासाठी ५० लाख रुपये मदत द्या. मला व माझ्या मुलांना व मला शासकीय नोकरी द्या. अशा अनेक मागण्या त्यांनी त्यांच्या निवेदनामध्ये केल्या आहे. आणि अखेर त्यांच्या निवेदन देऊन दहा ते अकरा दिवस उलटून सुद्धा प्रशासनाने कुठलीच दखल न घेतल्यामुळे त्यांनी आज उपोषणाचा अखेर दिवस उगवला. आज उपोषण स्थळी शेतकरी योद्धा कृती समितीचे संस्थापक अध्यक्ष श्री बालाजी सोसे शेतकरी योद्धा कृती समितीचे प्रदेशाध्यक्ष श्री गजानन जायभाये व गावातील नागरिक उपस्थित होते आज प्रशासनाकडून पोलीस स्टेशनचे पीआय व तलाठी मॅडम व अनेक कर्मचाऱ्यांनी आज उपोषणाला भेट दिली स्वातीताई नागरे यांनी परत एकदा माहिती समोर आणली. बीड प्रकरण संतोष देशमुख यांच्या मुलांना जशा पद्धतीने सरकारने न्याय दिला तशाच पद्धतीने माझ्या मुलांना सुद्धा न्याय द्यावा जर सरकारला बलिदान घ्यायचा असेल तर तेही सुद्धा मी त्याला तयारी आहे असे आज पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले



Post a Comment
0 Comments