लोणार तालुक्यात अतिवृष्टी पावसामुळे झालेल्या अवकाळी पावसाने शेती आणि शेतकऱ्यांची पेरणी केलेली पिकांचे नुकसान झाले असून
माजी आमदार संजयजी रायमलकर यांनी केली शेती पिकांची पाहणी, शेतकऱ्यांना दिला धीर
बुलढाणा: गजानन राऊत
दिनांक :- २३ जूलै २०२५
अतिवृष्टी पावसामुळे झालेल्या अवकाळी पावसाने शेती आणि शेतकऱ्यांची पेरणी केलेली पिकांचे मोठे नुकसान झाले असून
लोणार तालुक्यात विविध भागात झालेल्या अवकाळी पावसाने शेती आणि पेरणी केलेले पिक देखील वाहुन गेले यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. लोणार तालुक्यातील आज नांद्रा मुंढे,देऊळगाव वारसा, जांबूळ,वेणी,आजीजपुर, खुरामपूर ,पांगराडोळे ,टिटवी ,धाड, लोणार, वडगाव तेजण, पारडी शिरसाट, शारा, असे अनेक लोणार तालुक्यातील विविध भागात या अतिवृष्टी अवकाळी पावसामुळे शेती आणि शेतकऱ्यांची पेरणी झालेले पिकांचे मोठे नुकसान झाले आहे सर्व भागात माजी, आमदार रायमुलकर यांनी पाहणी करून, शेतकऱ्यांशी सविस्तर चर्चा करून शेतकऱ्यांना दिला धीर शासकीय यंत्रणेला सर्वेक्षणाचे आदेश देण्यात आलेले आहेत यात कोणत्याच शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही ही खबरदारी देखील घेतली जाईल
असे सांगण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले केंद्रीय मंत्री मा.ना.श्री.प्रतापरावजी जाधव साहेब यांनी सर्व यंत्रणांना तातडीने सर्वेक्षणाचे सक्त आदेश दिले आहेत.यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा.बळीराम मापारी, संचालक शिव पाटील तेजनकर,शहरप्रमुख पांडुरंग सरकटे, उपसभापती कारभारी सानप, युवासेना तालुकाप्रमुख गजानन मापारी, युवासेनेचे शैलेश सरकटे,राजुभाऊ ताबिले व सरपंच उपसरपंच तथा शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी व महसूल विभागांचे अधिकारी उपस्थित होते.



Post a Comment
0 Comments