गण गण गणात बोतेच्या गजरात श्री संत गजानन महाराज ची पालखी विदर्भात दाखलश्री.च्या पालखीचे विदर्भाच्या प्रवेशाद्वारावर स्वागत
बुलढाणा गजानन राऊत
बुलढाणा जिल्ह्यातील
सिंदखेडराजा श्रीसंत गजानन महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे परतीच्या प्रवासात आज विदर्भाच्या सीमेवर आज (दि.२३) दुपारी तीन वाजताच 'गण गण गणात बोते'च्या अखंड गजरात सावरगाव माळ परिसरात आगमन झाले व हा परिसर नामघोषात दुमदुमून गेला. तब्बल सातशे वारकरी, भजनी मंडळांचे निनाद, टाळ-मृदंगाची साथ आणि भगव्या पताकांच्या फडफडाटात फुलांनी सजवलेल्या पालखीत विराजमान 'श्री'च्या मुखवट्याचे दर्शन होताच वातावरण भक्तिरसाने भारावून गेले.
मराठवाडा-विदर्भ सीमेवरील सावरगाव माळ येथे संत गजानन महाराजांच्या पालखीचे आगमन होताच भव्य स्वागताचा सोहळा रंगला. आमदार मनोज कायंदे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अँड जिल्हाध्यक्ष नाझेर काझी, नंदाताई कायंदे, माजी आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे, माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर, भाजपा प्रदेश प्रवक्ते विनोद भाऊ वाघ, माजी पंचायत समिती सभापती जगनमामा सहाणे यांसह मान्यवरांनी 'श्रीं'चे दर्शन घेऊन पालखीचा मानाने सत्कार केला. आमदार मनोज कायंदे यांच्या हस्ते वारकऱ्यांना लाडू वाटप केले. विदर्भाच्या प्रवेशद्वारावर पालखीचे स्वागत करताना संपूर्ण परिसर भगव्या रंगात न्हाऊन निघाला. भजनी मंडळांच्या अखंड गजराने भाविकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तर ओठांवर 'गजानन महाराज की जय'चा घोष घुमत होता. स्वागत सोहळ्यात उपविभागीय पोलिस अधिकारी मनिषा कदम, तहसीलदार अजित दिवटे, गटविकास अधिकारी अंकुश म्हस्के, महसूल विभागाच्यावतीने नायब तहसीलदार प्रांजल पवार, मंडळ अधिकारी टेकाळे आणि कन्हाळे, तलाठी गजानन दराडे, वसूदेव जायभाये, संजय सोनुने, नगरपरिषदेचे सभापती सतिश तायडे, विष्णू मेहेत्रे यांसह शेकडो कर्मचारी सहभागी झाले. सिंदखेडराजा पोलिस ठाण्याचे ठाणेदार आशीष इंगळे, पीएसआय बालाजी सानप, गोपनीय विभागाचे अंमलदार श्रावण डोगरे आणि जिल्ह्यातील ठाणेदारांनी पालखी सोहळ्यासाठी सुरक्षेची जबाबदारी सांभाळली. सोहळ्यादरम्यान वाहतुकीतील गर्दी टाळण्यासाठी सिंदखेडराजा पोलिसांनी जालना दिशेने जाणारी वाहतूक पर्यायी मार्गावर वळवून सुलभ व्यवस्था केली. त्यामुळे दिंडीचा प्रवास सरळीत झाला आणि भाविकांना त्रास होऊ दिला नाही. या दिंडीसोबत जिल्ह्यातील मोठा पोलिस बंदोबस्त तैनात होता. यात पोलीस निरीक्षक २, सपोनि/पोउनि ६, पोलिस अंमलदार ३०, महिला अंमलदार १०, वाहतूक अंमलदार १०, साध्या वेशातील पोलिस ५, दोन वाहने, वॉकी-टॉकी ८ अशा पथकासह सर्व कर्मचारी दिंडीच्या सुरक्षा आणि व्यवस्थेसाठी तैनात होते. किनगावराजा पोलिस ठाण्याचे ठाणेदार विनोद नरवाडे यांनी सिंदखेडराजाकडे जाणारी वाहतूक पर्यायी मार्गावरून वळवून भाविकांच्या सोयीसाठी विशेष व्यवस्था केली.पंढरपूरहून परतीच्या प्रवासाला निघालेली 'श्रीं'ची पालखी आज विदर्भात दाखल झाली असून, पहिला मुक्काम जिजाऊंच्या माहेरी, सिंदखेडराजा येथे आहे. नगरपरिषद आणि स्थानिक संस्थांनी जिजामाता विद्यालयात वारकऱ्यांसाठी मुक्काम, भोजन व आरोग्यसेवेची भव्य व्यवस्था केली आहे. आज, २४ जुलै रोजी सकाळी हजारो भाविकांच्या जयघोषात पालखी पुढील प्रवासाला मार्गस्थ झाली तर आज बीबी. येथे आगमन झाले सिंदखेडराजा शहर आज भक्तिरसात न्हाऊन निघणार असून,
२५ जुलै रोजी लोणार २६जलै ला मेहकर ला आगमन २७ जुलैला जानेफळ येथे आगमन होणार आहे तर २८ जुलै ला, शिर्ला नेमाने,२९जुलैला आवार, ३० जुलै ला खामगाव आणि ३१जुलै ला संत नगरी शेगाव येथे आगमन होणार आहे सर्व भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.


Post a Comment
0 Comments