मेहकर बुलेटिन एक्सप्रेस
बुलढाणा जिल्ह्याच्या मेहकर तालुक्यात सलग तीन ते चार दिवसापासून जोरदार पाऊस चालू असल्यामुळे
खंडाळा येथे अवकाळी पावसामुळे
रात्री येनुबाई सपकाळ रा. खंडाळा देवी ता. मेहकर जिल्हा बुलढाणा यांच्या घराची भिंत पावसामुळे कोसळून गेल्याची धक्कादायक घटना घडली असून यामध्ये कोणतेही जीवित हानी झाली नाही पण या कुंटुबाची काही किरकोळ संसार भांडी आणि इत्यादी साहित्य उध्वस्त झाले आसल्याची माहिती आहे हे कुटुंब झोपेत असताना अचानक
रात्री च्या सुमारास ही भिंत कोसळून गेली राहत्या घराची मागची भिंत पावसामुळे कोसळली या मध्ये कुंटुबाचा कोणताही सदस्य नसल्या मुळे जिवीत हाणी टळली हे कुटुंब पुढच्या खोलीमध्ये असल्याने कोणालाही दुखापत झाली नाही परंतु ही भिंत पाठी मागच्या गल्ली मध्ये कोसळली यात जवळील असलेल्या रहिवाश्यांना देखिल धोका निर्माण होण्याची शक्यता होती पण ही भिंत जागीच पडल्या मुळे आजुबाजूच्या रहिवाशांना कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले नसल्याचे सांगितले जात आहे पण ही मातीची भिंत असल्या मुळे जवळील असलेल्या नागरीकांना जीवित हाणी होण्याचा मोठा अनर्थ टळला सलग येणाऱ्या मुसळधार पावसामुळे ही भिंत कोसळून गेली व
या घटनेचे तातडीने पंचनामे करून मदत मिळावी अशी मागणी या कुटुंबाकडुन होत आहे

Post a Comment
0 Comments