Type Here to Get Search Results !

डास निर्मूलनासाठी खंडाळा देवी इथे धूर फवारणी करण्याची मागणी गजानन राऊत यांनी ग्रामपंचायत सरपंच ग्रामसेवक यांच्याकडे केली आहे

 

मेहकर बुलेटिन एक्सप्रेस




बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील तहसील कार्यालय मेन पॉइंटवर असलेलं गाव खंडाळा (देवी) गावात सध्या वाढलेला डासांचा प्रादुर्भावामुळे डेंगू आजाराचा धोका निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे याला आळा घालण्यासाठी गावात तात्काळ धुरफवारणी करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते  गावातील नागरिक पत्रकार गजानन कडूजी राऊत यांनी ग्रामपंचायत खंडाळा देवी यांच्याकडे प्रसिद्धी पत्रकाराद्वारे केले आहे अलीकडील पावसामुळे नाल्यात व घराभोवती गवताची वाढ होत आहे या मध्ये पाणी सासले असून त्यामुळे डासाचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे दुर्गंधीमुळे सामान्य नागरिकांच्या आरोग्यावर देखील परिणाम होत आहे डासांचा  परिणाम होऊ नये म्हणून व आरोग्याच्या तक्रारी वाढुनये म्हणून धूरफवारणी करण्याची गरज आहे व डासांचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे लहान मुलांचे व ज्येष्ठांचे आरोग्य धोक्यात यायची शक्यता आहे गावातील , ठिकठिकाणी डासांचे परिणाम दिवसेंदिवस होत आहे गल्ली व पडीत जागा असलेला ठिकाणी घाण पाणी होत आहे



अनेक ठिकाणी सांडपाणी सरळ वाहून जात नाही पाणी तुंबल्याने मोठ्या प्रमाणात डासाचं आगमन व दुर्गंधी वाढ त आहे , यामुळे साथीचे आजार वाढण्याची भीती निर्माण झाली आहे शिवाय मलेरिया डेंग्यू या सारख्या साथीचे रोग पसरू नये डेंगू सारखा रोगांचा थैमान घालू नये यासाठी लहान मुलं वयस्कर नागरिकांसाठी शारीरिक व मानसिक धोका निर्माण होऊ नये म्हणून

फॉगिंग मशीनद्वारे संपूर्ण गावात धूरफवारणी करावी पावसामुळे गावात ठिकठिकाणी गवत ही मोठ्या प्रमाणात वाढलेले असून त्यामुळे साप व इतर कीटकांचा धोका निर्माण होत आहे दूरफवारणी बरोबरच या ठिकाणी तननाशक  औषधी फवारणी व्हावी अशी मागणी गजानन कडुजी राऊत यांनी ग्रामपंचायत खंडाळा (देवी)सरपंच व ग्रामसेवक  अधिकारी यांच्याकडे केली आहे

Post a Comment

0 Comments