मेहकर बुलेटिन एक्सप्रेस
मुख्य:संपादक:गजानन राऊत
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट पत्रकारिता राज्यस्तरीय पुरस्कारासाठी विष्णु आखरे पाटील यांची निवड
सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त तसेच आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते सो मधुकरराव खंडारे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ राज्य राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले जाणार आहे शैक्षणिक साहित्य कला पत्रकारिता युवा कार्यकर्ता सामाजिक
क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना विशेष मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे मेहकर तालुक्यातील शेलगाव देशमुख येथील निर्भीड जेष्ठ पत्रकार सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असलेले सामाजिक कार्यकर्ते व शिक्षक पदी सेवा देऊन स्वतः निवृती घेतलेले विष्णु आखरे पाटील यांना यावर्षी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट पत्रकारिता राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे सदरचा पुरस्कार मुख्य: मुख्य आयोजन सचिन खंडारे व विकास सुखदाने व, सदस्यांनी विष्णु आखरे पाटील यांच्या विशेष कार्याची दखल घेऊन जाहीर केला, मेहकर तालुक्यासह बुलढाणा जिल्ह्यात परिचित असलेले विष्णु आखरे पाटील यांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट पत्रकारिता राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सर्वच स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे, मिळालेला पुरस्कार छत्रपती शिवाजी महाराज राजमाता अहिल्यादेवी होळकर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी अर्पण करीत असून पुरस्कार सोहळ्याचे मुख्य आयोजक सचिन खंडारे निवड समिती अध्यक्ष विकास सुखदाने व सर्व सदस्यांनी विष्णू आखरे पाटील यांचे आभार व्यक्त केले पुढील शुभेच्छा

Post a Comment
0 Comments