पंधरा वर्षे जुन्या आय स्कॅनर व फिंगर प्रिंट स्कॅनर ने आधार अपडेट साठी लागतो उशीर.
मेहकर दि:२९-०९-२०२५
मेहकर प्नतिनिधी:गजानन राऊत
सध्या कोणतेही काम असो आधार शिवाय होईनात त्याने विविध कामासाठी लागणाऱ्या आधारला अपडेट करावेच लागते त्याला पाहता सध्या आधार सेंटरवर गर्दी दिसून येते मात्र कित्येक आधार सेंटरवर पंधरा वर्षे जुनी स्कॅनर असल्याने आधार अपडेट साठी खूप उशीर लागतो तर दुसरीकडे आधार सेंटर सुद्धा कमी आहेत त्याने जनतेला कामधंदा सोडून आधार सेंटर पाहत फिरावे लागते तर कित्येक वेळा ज्या ग्रामीण भागाला कधी जायचं काम नाही पडले त्या गावात जाऊन आधार अपडेट करून घ्यावा लागतो.
शाळेमध्ये विद्यार्थ्यांचे आधार अपडेट करून घ्या यासाठी शिक्षकांचे पालकांना कॉल चालू असतात त्याशिवाय बँकेचे काम इतर अनेक कामे यासाठी आधार लागतो मात्र आधार अपडेट पाहिजे तेव्हा अपडेट करण्यासाठी लोकांना इकडून तिकडे तिकडून इकडे येरझऱ्या लागतात तर आधार सेंटर वर गेल्यानंतर कधीच डोळ्याचे स्कॅन लवकर येत नाही तर कधी हाताचे ठसे येत नाहीत त्याला पाहता दिवसभरात तीस ते चाळीस आधार अपडेट होतात आणि एका सेंटरवर दररोज शंभर ते दीडशे लोक आधार अपडेट साठी येऊन बसतात एक दिवस दोन दिवस थकल्यानंतर हे लोक ग्रामीण भागामध्ये ज्या गावात जायला गाडी नसते अशा गावात जाऊन आधार अपडेट करून घेत आहेत त्यासाठी पाच ते दहा जण मिळून एक गाडी करतात आणि आधार अपडेट करून घेतात.
मेहकर तालुक्यामध्ये १२ आधार सेंटर असून या मधे मेहकर शहर 3,डोणगाव ३, हिवरा साबळे १, हिवरा आश्रम १, हिवरा खुर्द १,घाटबोरी १,चायगाव १ या ठिकाणी आधार सेंटर असून या आधार सेंटरवर जी आय एस स्कॅनर व फिंगरप्रिंट स्कॅनर हे पंधरा वर्षे जुने म्हणजेच २०११ मध्ये आलेले आहेत त्याला पाहता एका दिवसात ३० ते ४० लोकांचे आधार अपडेट होत आहेत मात्र आधार अपडेट साठी येणाऱ्याची गर्दी पाहता हे अपुरे पडत असून जिल्हाधिकारी यांनी मंजूर झालेले नवीन आधार सेंटर कार्यान्वित करण्यासोबतच जे जुने आधार सेंटर आहेत त्या ठिकाणी असलेले स्कॅनर अद्यावंत करावेत जेणेकरून जनतेला आधारसाठी फिरावे लागणार नाही कित्येक लोकांची कामे आधारशिवाय अधुरी असून त्यांना आधारसाठी निराधार होऊन फिरावे लागते कुठे कुठे सकाळपासून संध्याकाळपर्यंत तात्काळत बसून सुद्धा आधार अपडेट होत नाही त्यांना परत दुसऱ्या दिवशी नंबर वन मध्ये लावावा लागतो.


Post a Comment
0 Comments