३० सप्टेंबर रोजी राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठ समोर मेहकर पंचायत समितीचे बहुतांश ग्रामसेवक अधिकाऱ्यांची लागणार.हजेरी
मेहकर बुलेटिन एक्सप्रेस
मेहकर:प्रतिनिधी गजानन राऊत
मेहकर दि, २९-०९-२०२५
![]() |
| पंचायत समिती मेहकर |
राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठ यांच्या समोर मेहकर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ३२ ग्रामपंचायती सुनावणी ३० सप्टेंबर रोजी होणार असून त्यासाठी मेहकर पंचायत समिती मधील अधिकारी कर्मचारी व ग्रामसेवक यांना प्रवीण कुमार मनसे कक्ष अधिकारी राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठ यांच्या समोर हजेरी लावावी लागणार
मेहकर पंचायत समिती अंतर्गत ९८ गावे येतात तेव्हा सन २०२० ते २२ या काळात कोरोना प्रकोप होता यावेळी माहिती अधिकारामध्ये प्रलंबित प्रकरणे यांची सुनावणी सध्या राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठ यांच्याकडे सुरू असून ३ सप्टेंबर रोजी मेहकर पंचायत समिती मधील अधिकारी कर्मचारी यांनी सुनावणीसाठी हजेरी लावली होती आत्ता यातील ३२ प्रकरणाची सुनावणी ३०सप्टेंबर रोजी होणार असून त्यासाठी गटविकास अधिकारी, कक्ष अधिकारी विस्तार अधिकारी अधीक्षक माहिती टेबल चे अधिकारी व ३२ ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक सोबतच माहिती अधिकार मध्ये मागितलेल्या माहिती च्या वेळी कार्यरत असलेले अधिकारी असे एकूण सत्तरच्या जवळपास अधिकारी व कर्मचारी यांची हजेरी अमरावती येथे राज्य माहिती आयोग खंडपीठ अमरावतीचे प्रवीण कुमार पुनसे यांच्यासमोर लागणार असून पुन्हा एक वेळ ३० सप्टेंबर रोजी मेहकर पंचायत समिती ओस पडणार. आहे

Post a Comment
0 Comments