Type Here to Get Search Results !

बुलढाणा जिल्ह्याच्या मेहकर मध्ये संभाजी ब्रिगेड च्या वतीने शेतकऱ्यांचा मोर्चा तहसील कार्यालयावर मोर्चा उपविभागीय अधिकारी मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी रस्ता रोको आंदोलन


मेहकर बुलेटिन एक्सप्रेसमे मेहकरहकर:गजानन राऊत


 बुलढाणा जिल्ह्याच्या मेहकर मध्ये  संभाजी ब्रिगेड च्या वतीने शेतकऱ्यांचा तहसील कार्यालयावर मोर्चा उपविभागीय अधिकारी मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी रस्ता रोको आंदोलन 



संभाजी ब्रिगेड चे जिल्हाध्यक्ष  शेतकरी नेते पांडुरंग पाटील यांच्या नेतृत्वात सर्व शेतकऱ्यांचा आक्रोश  मोर्चा निघाला

संपूर्ण महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करून त्वरित हेक्‍टरी किमान 50 हजार रुपये मदत देऊन विना अटी शर्ती शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यात यावा 




बुलढाणा जिल्ह्यात

ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना 50 हजार रुपये मदत द्यावी तसेच शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे, शेतकऱ्यांना शंभर टक्के पिक विमा द्यावा 

व  बुलढाणा जिल्ह्यातील येलो  मोझॅकसहित रिजेक्ट व, प्रबंलित असलेले  पिक विमा तत्काळ जमा करण्यात यावे पिक पाहणी मध्ये शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणीमुळे  

तलाठी मार्फत उर्वरित शेतकऱ्यांचा पीकपेरा  नोंदण्यात यावा

फळबाग तुषार ठिबक या सहित इतर  शेतीविषयक योजनाचे रखडलेले अनुदान तत्काळ जमा करण्यात यावे  सोलर प्लेट बदलून

देण्यासाठी शेतकऱ्यांना विलंब  करणाऱ्या व त्रास देणाऱ्या कंपणन्यांवर  कठोर कारवाई करण्यात यावी  मागील काही दिवसांपासून  संपूर्ण महाराष्ट्र अतिवृष्टीने त्रस्त झाला आहे या आलेल्या महाभयंकर पुरामुळे सर्व ग्रामीण भागातील शेतकरी हातबल झाले आहे जिल्ह्यात कित्येक शेतकऱ्यांची पिके उध्वस्त झाले आहे येणाऱ्या पाण्यामुळे शेतकऱ्यांची जमीन खरडून गेली आहे  तसेच जनावरे गुरेढोरे


मूर्ती मुखी पडले आहे  याकडे सरकारने तातडीने लक्ष घालून मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे या मागणीसाठी 

बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील शेतकऱ्यांनी 

मेहकर तहसील कार्यालयावर उपविभागीय अधिकारी मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्या करिता रस्ता रोको आंदोलन सुरू केले

Post a Comment

0 Comments