Type Here to Get Search Results !

ओला दुष्काळ कर्जमाफीसाठी संभाजी ब्रिगेडचा रास्ता रोखो आंदोलन

 ओला दुष्काळ कर्जमाफीसाठी संभाजी ब्रिगेडचा रास्ता रोखो आंदोलन


मेहकर:गजानन राऊत


मेहकर दि. २९-०९-२०२५



ओला दुष्काळ कर्जमाफी द्यावी यासह विविध मागण्यांसाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने सोमवारी मेहकरात रास्ता रोखो आंदोलन करण्यात आले जिल्हाध्यक्ष तथा शेतकरी नेते पांडुरंग पाटील यांच्या नेतृत्वात हे आंदोलन झाले ओला दुष्काळ  



 शेतकऱ्यांचा सातबारा कोरा, करा हेक्टरी ५० हजार रुपये भरपाई प्रबंलित पीकविमा सोलारप्लेट साठी विलंब करणाऱ्या कंपन्याविरुद्ध कारवाई आशा मागण्यांसाठी संभाजी ब्रिगेडचा आज आक्रमक भूमिका घेतली, रास्ता रोखोमुळे वाहतूक काही काळ ठप्प झाली होती उपविभागीय अधिकारी रवींद्र जोगी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवण्यात आले, आंदोलनात कैलास पाचपोर , सुनील वाघमारे, धनंजय बुरकुल, कैलास पवार,  रमेश बचाटे, गजानन पवार,पंजाब पवार, प्रविण काळदाते, रवी वाघ, रमेश चनखोरे, संदीप नागरिक, दिपक जाधव, अविनाश काळे, दत्तात्रेय गिऱ्हे, शिवा मानघाले,यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला




Post a Comment

0 Comments