मेहकर:गजानन राऊत
मेहकर तालुक्यातील जानेफळ येथे
सकल धनगर समाजाचा मेंढ्या रस्त्यावर आणून आंदोलन दिवसापूर्वी
जालना येथे धनगर समाजाचे दीपक बोराडे यांनी धनगर समाजाचा एसटीमध्ये अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनास जाहीर पाठिंबा म्हणून व शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज १ सप्टेंबर रोजी मेहकर तालुक्यासह जानेफळ येथे मेढपाळानी मेंढ्या रस्त्यावर आणून चक्काजाम आंदोलन केले
धनगर समाजाचा अनुसूचित जमाती (एस.टी.) प्रवर्गामध्ये समावेश करून अंमलबजावणी करण्यासाठी जालना येथे गेल्या पंधरा दिवसापासून दीपक बोराडे यांचे आमरण उपोषण सुरू आहे त्या उपोषणाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज संपूर्ण राज्यभरात जिल्हा पातळीवर आंदोलन करण्यात आले त्या आंदोलनाला पाठिंबा देत जानेफळ येथे सकल धनगर समाजाने आपल्या मेंढ्या चक्क रस्त्यावर आम्ही छत्रपती शिवाजी महाराज चौकात चक्काजाम आंदोलन केले
सरकारने धनगर समाजाला मिळालेल्या (NTC) (Non Tribal Communities) अंतर्गत साडेतीन टक्के आरक्षण मिळते परंतु ते अति मागास असल्यामुळे हैदराबाद गॅजेट नुसार S T मध्ये आरक्षण मिळावे त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये मेंढपाळांनी स्वतःच्या मेंढ्या रस्त्यावर आणून केली चक्काजाम आंदोलन येळकोट येळकोट जय मल्हार, आरक्षण आमच्या बापाचं नाही कोणाच्या हक्काचं, एकच छंद गोपीचंद अशा घोषणा देऊन प्रशासन व शासनाचे लक्ष वेधले
या आंदोलनामध्ये जानेफळ परिसरातील सकल धनगर समाज व नवयुवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments