Type Here to Get Search Results !

नवसाला पावणारी आणि हाकेला धावणारी जय जगदंबा माता व रेणुका माता आणि ईसाई माता या नावाने ओळखल्या जाणारी खंडाळा गावचं कुलदैवत

 


मेहकर बुलेटिन एक्सप्रेस

प्रतिनिधी: गजानन राऊत





बुलढाणा जिल्ह्याचा मेहकर तालुक्यातील खंडाळा येथे जयजगदंबा देवी आणि रेणुका देवी मंदिरात पारंपरिक पद्धतीने होम हवन करण्यात येते देविला निवद दाखवून देवीची आराधना केली जाते कुलदैवत या देवीला होम हवन दाखवण्यात येते कित्येक वर्षांपासून चालू असलेली परंमपरा आजही खंडाळा येथे कायम आहे नवसाला पावणारी आणि हाकेला धावणारी जय जगदंबा माता व रेणुका माता आणि ईसाई माता या नावाने ओळखल्या जाणारी खंडाळा गावचं कुलदैवत हे गाव देखील खंडाळा देवी नावाने ओळखल्या जाते अनेक काळापासून या जय जगदंबा व रेणुका देवी मंदिराची परंपरा आजही या खंडाळा देवी गावात कायम आहे 




कित्येक वर्षांपासून देवीच्या मंदिरांमधील परंपरा कायम ठेवल्या जातात, जसे की नवरात्र उत्सव, कुलदेवीचे वार्षिक दर्शन आणि होम हवन करतांना जगदंबादेवीच्या आणि रेणुका देवी मंदीरात हजारोच्या संखेने भाविकांची गर्दी असते नवरात्री उत्सव झाला कि काहीच दिसानंतर या देवीची जत्रा असते  

 दरवर्षी शारदीय नवरात्रात देवीची महा पूजा केली जाते. देवीच्या विविध स्वरूपांची पूजा करून हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. विजयादशमी दशरा साजरा केला जातो देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची महाप्रसादाची जयत तयारी केली जाते वर्षानुवर्षे चालत आलेली परंपरा कायम आहे देवीला प्रसन्न करण्यासाठी आणि तिचा आशीर्वाद मिळवण्यासाठी महा पुजा होम हवन केले जाते. 

या विधीमुळे परिसरात सकारात्मक ऊर्जा येते आणि नकारात्मक शक्तींचा नाश होतो असेही मानले जाते

इच्छा पूर्ण करण्यासाठी, यश, संपत्ती आणि समृद्धीसाठी हवन करणे प्रभावी मानले जाते. या गावाचं खास वैशिष्ट्य आहे

Post a Comment

0 Comments