मेहकर:गजानन राऊत
मेहकर दि:१८/१०/२०२५
आंध्रुड:-जि.परिषद.मराठी प्राथमिक आंध्रुड शाळेत विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद शाळेत, विद्यार्थ्यांचं व शिक्षकांचा अनोखा उपक्रम
यावर्षी दिवाळीमध्ये स्वतः निर्मिती केलेले आकाश कंदील कागदी पणत्या यांचे भव्य प्रदर्शन भरवले
यामध्ये मुख्याध्यापक शिक्षक वर्ग यांचे लाख मोलाचे सहकार्य लाभले या दिवाळीस खास
आकाशकंदील व रंगभरण स्पर्धा उत्साहात मेहकर तालुक्यातील जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा,आंध्रुड येथे दिनांक आज १८ ऑक्टोबरला दिपावली निमित्त वर्ग पहिला ते ८ वी च्या विद्यार्थ्यांची आकाशकंदील व रंगभरण स्पर्धा घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी टाकाऊ वस्तूपासून सुंदर आकाशकंदील बनविले. मुलांनी अतिशय उत्साहाने तल्लीन होऊन चित्रांमध्ये रंग भरले व आकाशकंदील बनविले.
विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला वाव देणे या प्रमुख उद्देशाने या दोन स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये क्रमांक काढून विद्यार्थ्यांना रोख बक्षीस वितरण करण्यात आले. या जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेचा अनोखा वैशिष्ट्य तालुक्यामध्ये उमटले या स्पर्धा निमित्ताने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद,समाधान व उत्साह पाह्यला मिळाला यावेळी विद्यार्थी आणि व सर्व शिक्षक उपस्थित होते


Post a Comment
0 Comments