बुलढाणा जिल्ह्याच्या मेहकर
उपविभागीय अधिकारी संतोष खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली मेहकर ठाणेदार , व्यंकटेश आलेवार यांनी मेहकारातून काढला पोलिसांचा रूट मार्च
मेहकर:गजानन राऊत
बुलढाणा जिल्ह्याच्या मेहकर मध्येरूट मार्च मेहकर पोलीस सतर्क रूट मार्च दरम्यान मोटरसायकला नंबर प्लेट नसलेल्या ट्रिपल सीट गाड्यांवर व फॅन्सी नंबर प्लेट असलेल्या गाड्यांवर २ व्हीलर ४ व्हीलर गाड्यांवर देखील उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे यांनी व मेहकर ठाणेदार यांनी स्वतः केली दंडात्मक कारवाईकरण्यात आली
मेहकर येथे दिनांक १६ ऑक्टोबर रोजी जगदंबा माता विसर्जन मिरवणूक असल्यामुळे व येणाऱ्या सणासुदीच्या दिवसात पोलीस १००% टक्के सतर्क असून आपल्या संरक्षणासाठी सज्ज आहेत व गुन्हेगारी प्रवृत्तीचा विनाश करण्यासाठी मेहकर उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे यांच्या मार्गदर्शनात मेहकर येथून निघाला पोलिसांचा रुटमार्च जनतेसाठी पोलीस सतर्क असून आपल्या संरक्षणासाठी नेहमीच तयार आहेत याची जाणीव यावेळी आली मेहकर उपविभागीय अधिकारी संतोष खाडे यांच्या मार्गदर्शनात मेहकर शहरातून पोलिसांची 'रूट मार्च आगामी सण-उत्सव आणि कायदा-सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने मेहकर पोलीस दल सज्ज असल्याची ग्वाही देण्यासाठी, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली मेहकर शहरातून दिनांक १५ ऑक्टोबर रोजी पोलिसांचा 'रूट मार्च' (संचलन) काढण्यात आला.१६ऑक्टोबर रोजी जगदंबा माता विसर्जन मिरवणूक आणि येणाऱ्या सणासुदीच्या पार्श्वभूमीवर पोलीस दल अधिक दक्ष आणि सतर्क आहे. जनतेच्या संरक्षणासाठी पोलीस नेहमीच तयार असून, गुन्हेगारी प्रवृत्तीचा बीमोड करण्यासाठी कठोर पाऊले उचलली जातील, असा संदेश या संचलनातून देण्यात आला.
या 'रूट मार्च'मुळे नागरिकांना पोलीस प्रशासनाच्या तयारीची आणि सतर्कतेची जाणीव झाली आणि जनतेमध्ये सुरक्षेची भावना वाढीस लागली.


Post a Comment
0 Comments