Type Here to Get Search Results !

शेतकऱ्यांच्या फसव्या मदत पॅकेजचा निषेध — मेहकर येथे शासन निर्णयाची होळी क्रांतिकारी शेतकरी संघटना राज्य सरकारच्या विरोधात आक्रमक

 शेतकऱ्यांच्या फसव्या मदत पॅकेजचा निषेध मेहकर येथे शासन निर्णयाची होळीक्रांतिकारी शेतकरी संघटना राज्य सरकारच्या विरोधात आक्रमक

मेहकर:गजानन राऊत

दिनांक : 15 ऑक्टोबर 2025

मेहकर, जि. बुलढाणा



राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाने दिनांक 10 ऑक्टोबर 2025 रोजी महसूल व वन विभागामार्फत जाहीर केलेला शासन निर्णय हा फसवा, अपुरा आणि शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळ करणारा आहे, असा तीव्र निषेध आज मेहकर येथे नोंदविण्यात आला.




मेहकर उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर शेतकरी संघटनांच्या वतीने शासन निर्णयाची होळी करून शासनाच्या दुर्लक्षाचा निषेध व्यक्त करण्यात आला.

या आंदोलनात डॉ. ज्ञानेश्वर टाले, सहदेव लाड, गणेश गारोळे, प्रवीण उतपुरे, सलीम शहा, महेश देशमुख, शरद देशमुख, शिंदे जाधव मामा आणि एकनाथ वाघ यांच्यासह अनेक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेतकऱ्यांनी “कागदी मदत नको — खरी मदत द्या!”, “शासन जागे व्हा!”, “शेतकऱ्यांच्या घामाचा सन्मान करा!” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून सोडला.

शेतकरी नेत्यांनी सांगितले की 


> “अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे संपूर्ण नुकसान झाले आहे. पिके, जनावरे, माती आणि घरे वाहून गेली आहेत. शासनाने महसुलात सूट, कर्ज पुनर्निर्धारण आणि वीज माफी अशा केवळ औपचारिक सवलती जाहीर केल्या आहेत; पण वास्तविक आर्थिक मदत, पीकविमा अंमलबजावणी आणि तात्काळ पुनर्वसनाचा कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही. हा शासन निर्णय म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा निर्णय आहे.

क्रांतिकारी शेतकरी संघटनांनी शासनाकडे पुढील ठोस मागण्या केल्या आहेत 

1. वास्तविक पंचनाम्यांनुसार प्रत्येक शेतकऱ्याला थेट आर्थिक मदत द्यावी.2. पीकविमा देयके तात्काळ वितरित करावीत.3. बियाणे व खतांचे मोफत वितरण करावे.4. प्रशासकीय निष्काळजीपणाबद्दल संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी.या आंदोलनात सहभागी सर्व शेतकऱ्यांनी पुढील काळातही शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणांविरोधात लढा सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.

Post a Comment

0 Comments