तुरीवर मर रोगाचा प्रादुर्भाव. शेतकऱ्यांनी ५ एकर तुरीवर चालविला रोटावेटर
मेहकर गजानन राऊत
बुलढाणा जिल्ह्याच्या मेहकर तालुक्यातील मादणी येथे
शेतकरी अमोल जाधव यांनी चक्क ५एकर तुरीवर कंटाळून ट्रॅक्टर चालविला
एकीकडे अतिवृष्टी ने शेतकरी हतबल झाला असताना शासनाने अद्याप पर्यंत मदत खात्यात न टाकल्याने शेतकरी त्रस्त असताना दुसरीकडे डोणगाव परीसरात तुरीवर मर रोगाने थैमान घातले त्यामुळे मादणी येथील त्रस्त शेतकरी अमोल जाधव यांनी चक्क ५एकर तुरीवर कंटाळून ट्रॅक्टर चालविला. मागील पंधरा दिवसापासून तुरीमध्ये मोर रोगाचा प्रादुर्भाव दिसतात दोन-तीन फवारण्या केल्या व एक वेळेस ड्रिंकिंग केली तरी पण तुरीमध्ये मर रोगाचा प्रादुर्भाव थांबत नसल्यामुळे शेवटी रोटर फिरविण्याची वेळ आली आहे. त्यामुळे शासनाने त्वरित शेतकरी यांना अर्थीक मदत करण्याची गरज असून खचलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज आहे अन्यथा विदर्भातील शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्याची वेळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Post a Comment
0 Comments