Type Here to Get Search Results !

झेंडू उत्पादक शेतकरी हवालदिल बुलढाणा जिल्ह्यातील मेहकरमध्ये दिवाळीच्या उत्साहात फुलांना कवडीमोल भाव

 

मेहकर बुलेटिन एक्सप्रेस न्युज

मेहकर :गजानन राऊत




(बुलढाणा)जिल्ह्यातील मेहकर

बाजार पेठात नागरिकांची गर्दी

मेहकर दि:21-10-2025

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मेहकरच्या बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी उसळली आहे. विशेषतः लक्ष्मीपूजनासाठी मूर्ती खरेदी करण्याकरिता बाजारात उत्साह दिसून येत असून, मूर्तींची किंमत १०० ते ७०० रुपयांपर्यंत आहे.


पण, दुसरीकडे झेंडू उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडली आहे.


दिवाळीत झेंडूच्या फुलांना मोठी मागणी मिळेल या आशेवर असलेल्या शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाला आहे. बाजारात झेंडूच्या फुलांना कवडीमोल भाव मिळत असल्याने आणि अपेक्षित मागणी नसल्यामुळे शेतकऱ्यांनी संतप्त होऊन आपली फुले चक्क रस्त्यावर फेकून दिली. फुलांना योग्य भाव न मिळाल्याने शेतकऱ्यांची दिवाळी साजरी करण्याची आशा मावळली आहे आणि त्यांच्यामध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे. दिवाळीसाठी काही उत्पन्न मिळेल या अपेक्षेवर पाणी फिरले आहे.

Post a Comment

0 Comments