Type Here to Get Search Results !

मेहकर बस स्थानकावरील धक्कादायक घटना बस मध्ये सीट न मिळाल्याने दोन महिला प्रवाशांच भांडन या मध्ये महिला पोलीस कर्मचाऱ्यास मारहाण



मेहकर :बुलेटिन एक्सप्रेस न्युज  

मेहकर बस स्थानकावरील घटना भांडण सोडणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्यास मारहाण, मेहकर बस स्थानकावरील धक्कादायक घटना दोन महिला विरुद्ध गुन्हा दाखल



 मेहकर जळगाव बस मध्ये सीट मिळण्याच्या वादातून दोन महिला प्रवाशांच भांडन सुरू झाले हे सोडवण्यासाठी गेलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्यास मारहाण केल्याची धक्कादायक घटना २४ ऑक्टोंबर २०२५ रोजी मेहकर एसटी बस स्थानकावर घडली आहे एसटी मध्ये सीट न मिळाल्याने वाद सुरू झाला आणि भांडण सुरु झाले हे भांडन सोडवण्यासाठी महिला पोलीस कर्मचारी गेल्या असतास त्यांना सुध्दा मारहाण या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. बसमधील सीट न मिळाल्याने झालेल्या वादातून दोन महिलांमध्ये भांडण सुरू झाले. हे भांडण सोडवण्यासाठी पुढे गेलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्यास या दोघीं महिलांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली. दिवाळीनिमित्त बसस्थानकावर वाढलेली गर्दी व चोरीच्या घटना रोखण्यासाठी पोलीस प्रशासन सतर्क असून महिला व पुरुष कर्मचाऱ्यांची विशेष ड्युटी लावण्यात आली आहे. सकाळी सुमारे साडेअकरा वाजता मेहकर– एसटी बस स्थानकावर मेहकर जळगाव बसमध्ये सीटसाठी दोन महिला प्रवाशांमध्ये वाद झाला. हा वाद सोडवण्यासाठी महिला पोलीस कर्मचारी पुढे गेल्या असता, दोघींनी मिळून त्या पोलीस कर्मचाऱ्यास शिवीगाळ करत चापटा मारल्या धक्का बुक्की केल्या गेली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. असल्याचा आरोप महिला पोलीस कर्मचारी यांनी केला आहे या प्रकारामुळे बसस्थानकावर काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. घटनेची माहिती मिळताच मेहकर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी मेहकर पोलीसात दोघींन महिला विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला 

Post a Comment

0 Comments