बुलढाणा: प्रतिनिधी (गजानन राऊत)
बुलढाणा जिल्ह्यात खुनांच्या घटना वाढत चालल्या असून, एका दिवसात झालेला हा चौथा खून जिल्ह्यात भीतीचं वातावरण निर्माण करणारा ठरला आहे. देऊळगाव राजा तालुक्यातील अंधेरा गावात आकाश उत्तम चव्हाण (वय २५, रा. असोला बु.) या तरुणाची निर्दयपणे हत्या करण्यात आली.
धक्कादायक बाब म्हणजे ही घटना अंधेरा पोलीस स्टेशनपासून केवळ काही अंतरावर घडली आहे. या घटनेमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणात आयन सय्यद नासिर (वय अंदाजे १८ ते २०) या युवकाचे नाव पुढे आले आहे. अंधेरा बाजार गल्ली परिसरात या हत्येची घटना उघडकीस आली असून, तीक्ष्ण शस्त्राने वार करून आकाशचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
घटनेनंतर गावात प्रचंड तणाव निर्माण झाला असून, मेहकरचे उपविभागीय अधिकारी संतोष खाडे तसेच अंधेरा पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांनी परिसरात बंदोबस्तात ठेवत तपास सुरू केला आहे
या घटनेमुळे संपूर्ण जिल्हा हादरला असून, नागरिकांमध्ये भीती आणि संतापाची लाट उसळली आहे. पुढील तपास अंधेरा पोलीस करत आहेत.

Post a Comment
0 Comments