मेहकर व लोणार तहसील कार्यालयासमोर संभाजी ब्रिगेड आक्रमक
बुलढाणा जिल्हा:प्रतिनिधी गजानन राऊत
अतिवृष्टीमद्ये सामावेश न केल्यास सामुहिक आत्मदहन करनार -जिल्हाध्यक्ष शेतकरी नेते पांडुरंग पाटील
मेहकर व लोणार तालुका अतिवृष्टीच्या मदतीतुन वगळल्यामुळे संभाजी ब्रिगेडचा कृषीअधिकारी कार्यालयात ठिय्या.जिल्हाध्यक्ष शेतकरी नेते पांडुरंग पाटील यांनी पालकमंत्री व कृषीमंत्र्यांशी फोनवरुन चर्चा केली.तसेच लोणार तहसील कार्यालयासमोर लोणार तालुकाध्यक्ष विजय पिसे यांच्या नेत्रुत्वात आंदोलन व निदर्शने
करन्यात आली.जर मदतीमद्ये मेहकर व लोणार तालुक्यांचा सामावेश केला नाही तर सामुहिक आत्महत्येचा इशारा यावेळी निवेदनाद्वारे देन्यात आला.यावेळी संभाजी ब्रिगेड पदाधिकार्यांसहीत दोनही तालुक्यातील शेतकरी प्रचंड आक्रमक झालेले बघायला मिळाले.तसेच पांडुरंग पाटील यांनी याअगोदर ऑगष्ट महीन्यामद्ये पालकमंत्री मकरंद पाटील यांचेकडे भेटुन निवेदनाद्वारे दोनही तालुक्यांचा ओला दुष्काळ जाहीर करन्याची मागनी केली होती त्याचीही आठवण मंत्र्यांच्या स्विय सहायकांना आठवण करुन दिली.त्याचाही पाठपुरावा पाटील यांनी यावेळी केला.प्रसंगी मेहकर ता.अध्यक्ष धनंजय बुरकुल, तालुका संघटक भागवत दिघडे, कार्यकारणी सदस्य गजानन पवार, गजानन डव्हळे,गणेश तोंडे,भागवत डव्हळे,रवि वाघ, राजेंद्र बाजड सर,रिंकेश काळे, ज्ञानेश्वर डव्हळे, विवेक सिरसाट,संतोष डव्हळे,सुरज दुगड,समाधान डव्हळे,जय अंभोरे, विशाल डव्हळे,वामनराव डव्हळे, पंचायत समिति सदस्य प्रदीप डव्हळे,गोपाल डव्हळे, प्रविण डव्हळे यांच्यासहीत शेकडो शेतकरी आक्रमक झालेले दिसले.


Post a Comment
0 Comments