आमदार संतापले यादीत मेहकर आणि लोणार या तालुक्यांचा समावेश नसल्याने शेतकरी वर्गात संताप निर्माण झाला आहे. खरात यांनी या निर्णयाला अत्यंत अन्यायकारक आणि गंभीर बाब
मेहकर बुलेटिन एक्सप्रेस न्युज
:संपादक :गजानन राऊत
मेहकर व लोणार (जि. बुलढाणा) तालुक्यांमध्ये दिनांक २५ व २६ जून २०२५ रोजी झालेल्या ढगफुटी व अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाले. सरासरी हाजारोभाविकांची एक्टर पिके दोन्ही तालुक्यातील शेतजमिनी दुस्तर झाली फळबागा तुषार सिंचन व्यवस्था विहिरी व शेतीतील पिके यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून सुमारे ६६,००० हेक्टर शेती जमीन निकामी झाली आहे या अनुषंगाने शासन निर्णय दिनांक २७ मार्च २०२३ नुसार नुकसानभरपाईची प्रक्रिया सुरु आहे; मात्र दिली जाणारी रक्कम अत्यंत अपुरी असल्याने हेक्टरी ५०,००० रुपये नुकसानभरपाई देण्यात यावी तसेच बुजलेल्या विहिरी, सिंचन साधनसामग्री फळबागा आणि बागायती जमिनींचाही समावेश करण्यात यावा अशी मागणी आमदार सिद्धार्थ खरात यांनी यापूर्वी केली होती तथापि
९ ऑक्टोबर २०२५ रोजी शासनाने जाहीर केलेल्या २५३ तालुक्यांच्या यादीत मेहकर आणि लोणार या तालुक्यांचा समावेश नसल्याने शेतकरी वर्गात संताप निर्माण झाला आहे. खरात यांनी या निर्णयाला “अत्यंत अन्यायकारक आणि गंभीर बाब” म्हणत मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांना पत्र देऊन दोन्ही तालुके तत्काळ यादीत समाविष्ट करण्याची मागणी केली आहे खरात यांनी पुढे नमूद केले की, अतिवृष्टीची पहिली झळ मेहकर-लोणार परिसराला बसली, तरी शासनाच्या यादीत या तालुक्यांचा समावेश नाही, ही शेतकऱ्यांच्या जिव्हारी लागणारी बाब आहे. शासनाने तातडीने यादी दुरुस्त करून सुधारित निर्णय जाहीर करावा मुख्य मागण्या :मेहकर व लोणार तालुक्यांचा शासन निर्णयात समावेश करावा.हेक्टरी ₹५०,००० नुकसानभरपाई द्यावी.विहिरी, तुषार सिंचन, पाईप, फळबाग व बागायती जमिनींचाही समावेश करावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने काल ०९/१०/२०२५ रोजी निर्गमित झालेल्या शासन निर्णयात २५३ तालुक्याचा अतिवृष्टी यादीत समाविष्ट केलं परंतु मेहकर व लोणार तालुका सर्वाधिक अतिवृष्टी झाली असून २१० मीली मीटर ढगफुटी सदृश्य पाऊस झाला तरीसुद्धा या शासन निर्णयामध्ये लोणार व मेहकर तालुका वगळण्यात आला असून या तालुक्याचा त्वरित या यादीमध्ये समाविष्ट करून शासन निर्णय बदलण्यात यावा करिता निवेदनातून विनंती केली .यावेळी मेहकर मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ खरात व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते




Post a Comment
0 Comments