अंढेऱ्यातील खून प्रकरणी दोन्ही विधीसंघर्षग्रस्तांची बालनिरीक्षणगृहात रवानगी
बुलढाणा:गजानन राऊत
अंढेरा बाजार गल्लीत २५ ऑक्टोंबर च्या सायंकाळी मोबाईलच्या वादातून असोला बु, येथील तरुणाचा चाकूने खून करणाऱ्या तीन आरोपी पैकी दोन सोळावर्षीय विधीसंघर्षग्रस्त बालकांची बुलढाणा येथील बाल निरीक्षण गृहात रवानगी करण्यात आली आहे आकाश चव्हाण या युवकाची हर्षल गीते सह दोन विधिसंघर्षग्रस्त बालकांनी चाकूने भजकून हत्या केली होती या हल्ल्यात आकाचा जागीच मृत्यू झाला हर्षल यास २८ऑक्टोबर पर्यंत न्यायालयाने पीसीआर होता, तर दोन विधिसंघर्षग्रस्त , बालकांना अंढेरा ठाणेदार रुपेश शक्करगे, पोलीस उपनिरीक्षक सुरेश जारवाल, नितीन फुसे, भारत पोकळे यांनी २७ ऑक्टोबरला बुलढाणा येथील बाल न्याय मंडळासमोर हजर केले यानंतर दोघांची बाल निरीक्षण गृहात रवानगी करण्यात आली

Post a Comment
0 Comments