Type Here to Get Search Results !

कुलुप बंद घरावर चोरांचा डल्ला, अंजनी बु येथे एकाच रात्री चार घरात चोरी.

 कुलुप बंद घरावर चोरांचा डल्ला, अंजनी बु येथे एकाच रात्री चार घरात चोरी.


   मेहकर बुलेटिन एक्सप्रेस न्युज




 डोणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या ग्राम अंजनी बुद्रुक येथे २७ऑक्टोबर च्या रात्री अज्ञात चोरट्यांनी चार घरात चोरी केली यापैकी दोन घरात त्यांच्या हाती मुद्देमाल लागले असून त्याप्रकरणी डोणगाव पोलीस स्टेशन मध्ये कैफियत दाखल करण्यात आली.

     डोणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या ग्राम अंजनी बुद्रुक येथे २७ ऑक्टोबर च्या रात्री बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ राहणारे समाधान सदावर्ते हे कुलूप लावून गावी गेले असता २८ ऑक्टोबरच्या सकाळी त्यांना त्यांच्या शेजाऱ्यांनी फोन लावून माहिती दिली की तुमच्या घराचा दरवाजा उघडा असून सामान इकडे तिकडे फेकलेले आहे तेव्हा त्यांनी घरी येऊन पाहिले असता त्यांच्या अल्मारीत ठेवलेले नगदी २० हजार रुपये २० तोळे चांदीचे काकण, ५ ग्राम सोन्याची पोथ असे ऐकून १ लाखाचे मुद्देमाल चोरीला गेले तर समाज मंदिरा जवळ राहणारे सुखदेव गैबाजी चव्हाण यांच्या अलमारी मधील १० हजार रुपये नगदी चोरीला गेले व सिद्धार्थ चव्हाण,शांताराम गाडे यांच्या घरातील कुलूप तोडून चोरट्यांनी घराची झाडाझडती घेतली मात्र त्यांना काही मिळून आले नाही याप्रकरणी उशिरापर्यंत डोणगाव पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आलेली नव्हती.

Post a Comment

0 Comments