बच्चु कडुंच्या समर्थनार्थ बुलढाणा जिल्ह्यातही आंदोलन पेटनार
नाफेडची खरेदी शेतकर्यांची सोयाबीन संपल्यावर काय कामाची- शेतकरी नेते पांडुरंग पाटीलौ
मेहकर:गजानन राऊत
बच्चु कडुंच्या नेत्रुत्वात नागपुर येथे सुरु असलेल्या शेतकर्यांच्या प्रामुख्याने कर्जमाफी व इतर मागन्यासंदर्भात आंदोलनाला संभाजी ब्रिगेड बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने सक्रिय पाठींबा जाहीर करत मागन्या मान्य न झाल्यास तिव्र आंदोलनाचा इशारा देन्यात आला.अशा आशयाचे निवेदन मुख्यमंत्र्यांना उपविभागीय अधिकारी यांचेमार्फत पाठवन्यात आले.
सोबतच खरीप हंगाम २०२५ - २६ मधील सोयाबीन या पिकाची काढणी जवळपास आटोपली आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांनी दिलेल्या आश्वासनानुसार सोयाबीन या पिकाची अद्यापही नाफेड मार्फत होणारी शासकीय खरेदी सुरु करण्यात आलेली नाही. काही दिवसापूर्वी दिवाळी हा सन आटोपला त्यामुळे दिवाळीपूर्वी काढणी झालेल्या सोयाबीन पिकाची दिवाळी साजरी करण्याकरीता शेतकऱ्यांनी आपली सोयाबीन मातीमोल भावाने खुल्या बाजारपेठेत विकली. शासनाने सोयाबीन या पिकाला ५३२८ /- प्रति क्विंटल इतका दर निश्चित केला आहे. परंतु सध्या खुल्या बाजारात २८०० ते ४२००/- प्रति क्विंटल भावाने सोयाबीन खरेदी सुरु असल्यामुळे शेतकऱ्यांची अतिशय मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट सरकारच्या नियोजनच्या अभावामुळे याठिकाणी होत आहे. याला सर्वस्वी सरकार जबाबदार आहे असा आरोप शेतकरी नेते पांडुरंग पाटील यांनी केला. याचमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे.शेतकरी मेल्यावर केवळ व्यापार्याजवळची सोयाबीन विकत घेन्यासाठी शासकीय खरेदी आहे का असा संतप्त सवाल पाटील यांनी केला.
त्यामुळे तत्काळ खरेदी चालु करुन ज्या शेतकऱ्यांनी खुल्या बाजारात सोयाबीनची विक्री केली आहे त्यासर्व शेतकऱ्यांना मध्यप्रदेश शासनाच्या धर्तीवर भावांतर योजना लागू करून उरलेली रक्कम संबधित शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात यावी. अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे तहसीलदारांमार्फत निवेदनाद्वारे करन्यात आली. यावेळी संभाजी ब्रिगेड जिल्हा सोशल मीडिया प्रमुख सुनिल वाघमारे, प्रहार जनशक्ती पक्ष ता.प्रमुख विष्णु साखरे,संभाजी ब्रिगेड ता.संघटक भागवत दिघडे, कार्यकारिणी सदस्य धिरज वैराळ आदी पदाधिकारी उपस्थित होते.


Post a Comment
0 Comments